आजचे राशीभविष्य, ०७ फेब्रुवारी २०२३: वृषभ राशीची कामे पूर्ण होणार, तर कुंभ राशीसाठी दिवस सुखाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 07:25 IST2023-02-07T07:24:53+5:302023-02-07T07:25:29+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी...

Todays Horoscope 07 February 2023 Taurus will get their work done while Aquarius will have a happy day | आजचे राशीभविष्य, ०७ फेब्रुवारी २०२३: वृषभ राशीची कामे पूर्ण होणार, तर कुंभ राशीसाठी दिवस सुखाचा

आजचे राशीभविष्य, ०७ फेब्रुवारी २०२३: वृषभ राशीची कामे पूर्ण होणार, तर कुंभ राशीसाठी दिवस सुखाचा

मेष: आजचा दिवस सावध राहण्याचा असून प्रत्येक पाऊल जपूनटाकावे लागेल. एखाद्या व्यक्तीशी तीव्र मतभेद संभवतात. शारीरिक व मानसिक दृष्टया त्रस्त व्हाल. आणखी वाचा...

वृषभ: आज आपण भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया ताजेतवाने राहाल. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा...

मिथुन: आज मनातील नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील.मनात असंतोष वाढेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. शारीरिक स्वास्थ्य पण मिळणार नाही. वाचन- लेखनात विद्यार्थ्यांचे मन लागणार नाही. आणखी वाचा...

कर्क: आज आपण भावनेच्या भरात वाहून जाल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आज आरोग्य चांगले राहील व मन ताजेतवाने राहील. दुपार नंतर मात्र मनात निराशेची भावना येऊन ते बेचैन होईल. आणखी वाचा...

सिंह: आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत नसाल. तेव्हा महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा...

कन्या: सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपार नंतर मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात व्यत्यय येईल. आणखी वाचा...

तूळ: आज कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागाल. गृहसजावटीत बदल कराल. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य वाढेल. उच्च अधिकार्यांमुळे व्यवसायात आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा...

वृश्चिक: परदेशस्थ स्नेह्यांकडून चांगल्या बातम्या येतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ सुद्धा संभवतो. नोकरीत पदोन्नती संभवते. आपले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण होऊ शकेल. आणखी वाचा...

धनु: आज सकाळी आपणास प्रकृतीचा त्रास जाणवेल. नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम मनःस्वास्थ्यावर होईल. सबब वैचारिक स्तरावर संयम बाळगावा लागेल. आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा...

मकर: आज कुटुंबीयांसह प्रवासाचा आनंद लुटाल. दुपार नंतर मात्र मन व्याकुळ होईल. अधिक खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा...

कुंभ: आजचा आपला दिवस सुखाचा व शांततेचा आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा...

मीन: आज आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल, मात्र शक्यतो भिन्नलिंगी व्यक्तींपासून दूर राहणे हितावह होईल. आज वाद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो बौद्धिक चर्चा टाळा. नवीन कार्यात अडचणी येतील. आणखी वाचा...

Open in app

Web Title: Todays Horoscope 07 February 2023 Taurus will get their work done while Aquarius will have a happy day