आजचे राशीभविष्य- ०५ फेब्रुवारी २०२३: कन्या राशीला आज धनप्राप्ती, तर तूळ राशीला नोकरीत बढतीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 07:20 IST2023-02-05T07:20:08+5:302023-02-05T07:20:49+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Todays Horoscope 05 February 2023 Virgo will get money today Libra will get job promotion | आजचे राशीभविष्य- ०५ फेब्रुवारी २०२३: कन्या राशीला आज धनप्राप्ती, तर तूळ राशीला नोकरीत बढतीची शक्यता

आजचे राशीभविष्य- ०५ फेब्रुवारी २०२३: कन्या राशीला आज धनप्राप्ती, तर तूळ राशीला नोकरीत बढतीची शक्यता

मेष: आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उदवेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. आणखी वाचा...

वृषभ: आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरां विषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. आणखी वाचा...

मिथुन: आज नातलग व मित्रांशी संवाद साधल्याने आपण आनंदित व्हाल. सुरवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल. आणखी वाचा...

कर्क: आज आपल्या मनात प्रेमालापाचे तरंग उमटतील. दिवसभर त्याच मनःस्थितीत आपण राहाल. मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. आणखी वाचा...

सिंह: आज कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. आणखी वाचा...

कन्या: आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा...

तूळ: आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मनात भावनात्मकता वाढेल. मातुल घराण्याकडून फायदा होईल. आणखी वाचा...

वृश्चिक: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. लेखन - साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल. आणखी वाचा...

धनु: आज आपणास खाण्या - पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो आज नवे काम हाती घेऊ नये. आणखी वाचा...

मकर: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यवसाय क्षेत्रात व्यापार वाढीस लागेल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मध्ये वाढ होईल. आणखी वाचा...

कुंभ: सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळाल्याने प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. स्त्रीयांना माहेरहून अनेक चांगल्या बातम्या मिळतील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. आणखी वाचा...

मीन: आज आपली सृजनशक्ती अधिकच वाढेल. कल्पनाशक्तीमुळे आज आपण साहित्य विश्वाची सफर कराल. आणखी वाचा...    
 

Web Title: Todays Horoscope 05 February 2023 Virgo will get money today Libra will get job promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app