Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- ९ नोव्हेंबर २०२२: मिथुन राशीतील व्यक्तींना नोकरी-व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील; विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 07:25 IST2022-11-09T07:22:50+5:302022-11-09T07:25:32+5:30
Today's Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- ९ नोव्हेंबर २०२२: मिथुन राशीतील व्यक्तींना नोकरी-व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील; विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील
मेष- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम उत्साह व आवेश यांनी पूर्णतः भरलेले असल्याचा अनुभव आपणास येईल. शरीर व मन स्फूर्ती आणी टवटवीतपणाने भरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आणखी वाचा
वृषभ- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज क्रोध व निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. आणखी वाचा
मिथुन- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी - व्यवसायात लाभाच्या बातम्या मिळतील. उच्च पदाधिकारी आपल्या कामाची प्रशंसा करतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आणखी वाचा
कर्क- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. कुटुंबियासह मनमोकळ्या गप्पा मारू शकाल. आणखी वाचा
सिंह- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा
कन्या- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
तूळ- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्तीसह प्रेमालाप होऊ शकेल. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वस्त्रालंकाराची खरेदी होऊ शकेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा
वृश्चिक- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज कौटुंबिक शांतीचे वातावरण आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकेल. नियोजित कामात यश मिळेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आणखी वाचा
धनु- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवासाचा बेत स्थगित ठेवावा. कार्यातील अपयश मनात नैराश्य निर्माण करील व त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्यास गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल. आणखी वाचा
मकर- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान - प्रतिष्ठेची हानी होईल. आणखी वाचा
कुंभ- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास मनाने हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या व आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाऊ शकाल. आणखी वाचा
मीन- आज चंद्र मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. रागावर व वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक व मानसिक आरोग्य मध्यम राहील. आणखी वाचा