Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १० नोव्हेंबर २०२२: अपघाताची शक्यता असल्याने 'या' राशीतील व्यक्तींनी प्रवास टाळावा; संपत्ती संबंधी अडचणी निर्माण होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 07:21 IST2022-11-10T07:09:20+5:302022-11-10T07:21:39+5:30

Today's Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस...,काय सांगते तुमची राशी...

Today's Daily Horoscope : Today's Horoscope - November 10, 2022: As there is a possibility of accidents, people of capricorn zodiac sign should avoid travel; Problems related to wealth will arise! | Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १० नोव्हेंबर २०२२: अपघाताची शक्यता असल्याने 'या' राशीतील व्यक्तींनी प्रवास टाळावा; संपत्ती संबंधी अडचणी निर्माण होतील!

Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य- १० नोव्हेंबर २०२२: अपघाताची शक्यता असल्याने 'या' राशीतील व्यक्तींनी प्रवास टाळावा; संपत्ती संबंधी अडचणी निर्माण होतील!

मेष- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आणखी वाचा

वृषभ- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज कुटुंबियांशी आपण विचार - विनिमय करू शकाल. घराच्या नूतनीकरणासाठी काही तरतूद कराल. घरी मातेशी व नोकरीत वरिष्ठांशी संबंधातील सौहार्दता वाढेल. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. आणखी वाचा

सिंह- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा

कन्या- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपार नंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. आणखी वाचा

तूळ- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. आणखी वाचा

वृश्चिक- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार - व्यवसायात आपण व्यस्त राहाल व त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण - घेवाण होईल. कौटुंबिक व वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. आणखी वाचा

धनु- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा

मकर- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा

कुंभ- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्याने आपले मन दुखावले जाऊ शकते. आणखी वाचा

मीन- आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. आणखी वाचा

Web Title: Today's Daily Horoscope : Today's Horoscope - November 10, 2022: As there is a possibility of accidents, people of capricorn zodiac sign should avoid travel; Problems related to wealth will arise!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app