Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २४ मे २०२२: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहील; भाग्यकारक दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 12:35 IST2022-05-24T07:16:52+5:302022-05-25T12:35:32+5:30
Today Daily Horoscope: Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २४ मे २०२२: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहील; भाग्यकारक दिवस
मेष: संमिश्र ग्रहमान राहील. आर्थिक आवक चांगली राहील. खर्चाचे प्रमाण देखील वाढते राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. त्यासाठी पैसे खर्च कराल. अचानक एखादा खर्च उद्भवू शकतो. महत्त्वाचे काम सायंकाळ होण्याच्या आत पूर्ण करून घ्या.
वृषभ: नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. त्यात तुमचा बराच वेळ जाईल. कष्ट करावे लागतील. मात्र, त्यात तुमचा फायदा होईल. प्रगतीच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल.
मिथुन: भाग्याची चांगली साथ राहील. प्रवासाचे योग येतील. प्रवासात दगदग होईल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. चांगले बदल होतील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. काहींना भेटवस्तू मिळतील. मान-सन्मान मिळेल.
कर्क: महत्त्वाचे काम सायंकाळच्या सत्रात हाती घ्या. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. वाहने जपून चालवा. प्रवासाचे नीट नियोजन करा. सरकार दरबारची कामे मार्गी लागतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे.
सिंह: महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करून घ्या. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल.
कन्या: महत्त्वाचे काम सकाळी किंवा दुपारी न करता सायंकाळच्या सुमारास हाती घ्या. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. व्यवसायात बरकत राहील. भागीदारांचे सहकार्य लाभेल. हितशत्रू डोके वर काढतील मात्र, आपण कामावर लक्ष केंद्रीत करा.
तूळ: नोकरीत साधक बाधक परिस्थिती राहील. काही कामे होतील. काही कामात अडथळा येऊ शकतो. महत्त्वाचे काम सायंकाळच्या आत पूर्ण करा. काहींना प्रवास करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. हलका फुलका आहार घ्या. जीवनसाथी चांगली साथ देईल.
वृश्चिक: भाग्य चांगली साथ देईल. दूरचे प्रवास घडतील. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. तुमची प्रशंसा होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. विदेशातील मुलांची आनंदाची बातमी कळेल. थोडी आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत बदल होईल.
धनु: भावंडांना मदत करावी लागेल. जवळचा प्रवास करावा लागेल. प्रवासात दगदग होईल. नोकरीत अनपेक्षित बदल होतील. घरी पाहुणे येतील. आपली गोपनीय माहिती गप्पांच्या ओघात कुणाला सांगू नका. मुलांच्या प्रगतीचा आढावा घ्या.
मकर: जीवनसाथी चांगली साथ देईल. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून घ्या. भेटीगाठी होतील. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात भरभराट होईल. अचानक मोठी संधी मिळेल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहील.
कुंभ: धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. अनेक प्रकारचे फायदे होतील. भेटवस्तू मिळतील. दिवसा मनावर थोडे दडपण आल्यासारखे वाटेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. जीवनसाथी तुमची काळजी घेईल.
मीन: महत्त्वाचे काम सायंकाळच्या सुमारास हाती घ्या. तोपर्यंत कामाचे नियोजन करून ठेवा. अचानक मोठी संधी मिळेल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण होतील. कायद्याची बंधने पाळा.
- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)