आजचे राशीभविष्य, १५ मार्च २०२३: यश, कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस; घरात शांततामय वातावरण राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 07:18 IST2023-03-15T07:17:08+5:302023-03-15T07:18:03+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today s Horoscope March 15 2023 Favourable day for success and fame peaceful atmosphere at home astrology zodiac signs | आजचे राशीभविष्य, १५ मार्च २०२३: यश, कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस; घरात शांततामय वातावरण राहणार

आजचे राशीभविष्य, १५ मार्च २०२३: यश, कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस; घरात शांततामय वातावरण राहणार

मेष: आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आपणाला एखादी अलौकिक अनुभूती होईल. वाणीवर संयम ठेवून अनेक गैरसमज आपण टाळू शकाल. आणखी वाचा 

वृषभ: आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रां कडून आनंददायी बातम्या मिळतील. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल. आणखी वाचा 

सिंह: आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील. त्यांची प्रकृती बिघडेल. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. आणखी वाचा 

कन्या: आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा 

तूळ: आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आणखी वाचा 

वृश्चिक: आज आपण तन - मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस कष्टदायक आहे. प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. व त्यामुळे मानसिक दृष्टया सुद्धा अस्वस्थ राहाल. रागावर जरा अंकुश ठेवा. एखादी दुर्घटना संभवते. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस नोकरी - व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होईल. आणखी वाचा 

कुंभ: आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारी व वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल. आणखी वाचा 

मीन: आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. आरोग्याची तक्रार राहील. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा  

Web Title: Today s Horoscope March 15 2023 Favourable day for success and fame peaceful atmosphere at home astrology zodiac signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app