आजचे राशीभविष्य, १ एप्रिल २०२३: आजचा दिवस लाभदायी; विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 07:16 IST2023-04-01T07:15:44+5:302023-04-01T07:16:21+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today s Horoscope April 1 2023 Today is a beneficial day success fame and benefits will be at various levels astro zodiac signs know whats your rashi says | आजचे राशीभविष्य, १ एप्रिल २०२३: आजचा दिवस लाभदायी; विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील

आजचे राशीभविष्य, १ एप्रिल २०२३: आजचा दिवस लाभदायी; विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील

मेष: आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संपत्ती विषयक कोणतेही काम करायला आजचा दिवस प्रतिकूल आहे. आणखी वाचा 

 

वृषभ: आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा 

 

मिथुन: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल. मित्र व हितचिंतकांचा सहवास घडेल. आणखी वाचा 

 

कर्क: आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयांकडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील. प्रवास व खाण्या - पिण्याचे चांगले बेत आखाल. प्रवास आनंददायी होईल. आणखी वाचा 

 

सिंह: आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. विदेशातून काही बातमी येईल. आणखी वाचा 

 

कन्या: आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र - मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. व्यापारात धन वृद्धी संभवते. रम्यस्थळ किंवा जलाशयाच्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवाल. संतती विषयक आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा 

 

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आणखी वाचा 

 

वृश्चिक: आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा 

 

धनु: आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्या पासून सावध राहावे लागेल. उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहणे हितावह राहील. आणखी वाचा 

 

मकर: दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. मोठया धनलाभाची संभावना आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून भरपूर प्राप्ती होईल. आणखी वाचा 

 

कुंभ: आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन - मन उत्साही व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. आणखी वाचा 


मीन: आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. प्रेमालाप होईल. आणखी वाचा  

Web Title: Today s Horoscope April 1 2023 Today is a beneficial day success fame and benefits will be at various levels astro zodiac signs know whats your rashi says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app