राशीभविष्य, १४ जानेवारी २०२५ : सन्मान वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, पण पैसे उसने देऊ नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 07:50 IST2025-01-14T07:49:25+5:302025-01-14T07:50:07+5:30
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

राशीभविष्य, १४ जानेवारी २०२५ : सन्मान वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, पण पैसे उसने देऊ नका
मेष - मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकरेत प्रवेश करेल. हे गोचर आपल्यासाठी नवीन जवाबदारीचे असेल. आपण आपली कामे सहजपणे पूर्ण करू शकाल. घर किंवा वाहन खरेदीसाठी हे गोचर अनुकूल आहे. आणखी वाचा
वृषभ - सूर्याचा मकरेतील प्रवेश आपणास अनुकूल असेल. आपणास नशिबाची साथ मिळेल. अनेक दिवसांपासून ज्या कामाची आपण वाट पाहात होता ते पूर्ण होईल. असे असले तरी ह्या दरम्यान यश प्राप्ती सहजासहजी होणार नाही. आणखी वाचा
मिथुन - सूर्याचा मकरेतील प्रवेश आपणास अनपेक्षित परिणाम देणारा आहे. ह्या दरम्यान आपली प्रतिष्ठा उंचावेल. आपण जर कोणाला पैसे दिले असतील व अनेक दिवसांपासून ते अडकले असतील तर ते ह्या दरम्यान आपणास मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कर्क - मकर संक्रांति पासून सूर्य मकरेत राहील. हे गोचर आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या दरम्यान आपणास थोडे सावध राहावे लागेल. कुटुंबात कलह होण्याची संभावना आहे. त्यामळे आपणास मानसिक अशांतता सुद्धा जाणवेल. आणखी वाचा
सिंह - सूर्याचे मकरेतील भ्रमण आपल्यासाठी काहीसे चांगले आहे. आपली संपूर्ण रणनीती आपणास अनुकूल व यशस्वी होईल. कोर्ट - कचेरीतील निकाल सुद्धा आपल्या बाजूने लागेल. ह्या दरम्यान शत्रू सुद्धा कमकुवत होतील. आणखी वाचा
कन्या - सूर्य मकरेत गेल्या पासूनचा एक महिना आपल्यासाठी उन्नतीदायक होईल. सूर्याच्या प्रभावाने आपण यशस्वी व्हाल. नोकरीत लाभ होईल. वरिष्ठांशी सलोखा राहील. आपल्या कामाचे कौतुक होईल. परीक्षेत यश प्राप्त होईल. संतती प्राप्ती सुद्धा संभवते. आणखी वाचा
तूळ - मकर संक्रांति पासूनचा एक महिन्याचा काळ आपल्यासाठी काहीसा कठीण असू शकतो. ह्या दरम्यान आपणास अनपेक्षित परिणामांसह चढ - उतारांचा सुद्धा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात कलह होऊ शकतो. त्यामुळे आपणास मानसिक त्रास होईल. आणखी वाचा
वृश्चिक - मकर संक्रांति पासूनचा एक महिन्याचा काळ आपल्यासाठी थोडा कठीण आहे. आपणास चांगले यश सुद्धा मिळू शकते. आपण आपली मेहनत व साहस ह्यांच्या जोरावर कठीण परिस्थितीचा सामना सुद्धा सहजपणे करू शकाल. आणखी वाचा
धनु - सूर्याचे मकर राशीतील भ्रमण आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या दरम्यान कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी मतभेद संभवतात. दुरावा सुद्धा येऊ शकतो. अशा वेळी आपणास विशेष प्रमाणात सावध राहावे लागेल. आणखी वाचा
मकर - सूर्य आपल्या राशीस असल्यामुळे आपला आत्मविश्वास उंचावेल, परंतु त्याच बरोबर आपण अहंकारी झाल्याचे सुद्धा दिसू शकते. एखाद्या गोष्टीने वैवाहिक जोडीदार, भागीदार ह्यांच्याशी संबंध बिघडू शकतात. तेव्हा काळजी घ्यावी. आणखी वाचा
कुंभ - सूर्याचे मकर राशीतील भ्रमण आपल्यासाठी चांगले आहे. असे असले तरी जास्त धावपळ झाल्याने खर्च सुद्धा होईल. हे गोचर चालू असता कोणालाही पैसे उसने देऊ नये, अन्यथा आपला पैसा अडकण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मीन - सूर्याचे मकर राशीतील भ्रमण आपल्यासाठी सामान्याहून चांगले आहे. ह्या दरम्यान आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. संपत्तीशी संबंधित वादात समाधान होईल. आपला सन्मान वाढेल. आणखी वाचा