आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२५ : लाभ संभवतात, स्वास्थ्य उत्तम राहील, वादविवाद टाळावेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 07:49 IST2025-01-13T07:48:28+5:302025-01-13T07:49:48+5:30
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२५ : लाभ संभवतात, स्वास्थ्य उत्तम राहील, वादविवाद टाळावेत!
मेष - आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी - व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. आणखी वाचा
वृषभ - आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. लेखक, कारागीर, कलावंत ह्यांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आणखी वाचा
मिथुन - आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर व मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आणखी वाचा
कर्क - आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणी वर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
सिंह - कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. आणखी वाचा
कन्या - सांप्रतकाली नव्या कामा संदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणार्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
तूळ - व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी व व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखनकार्य व बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. आणखी वाचा
वृश्चिक - सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा
धनु - मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
मकर - व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण - घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल. व्यापारी कामात विघ्न येईल. स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा
कुंभ - आपले विचार व बोलणे ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उदभवतील. अपचन व अजीर्ण अशा आजारातून स्वास्थ्य बिघडू शकते. आणखी वाचा
मीन - आज आपल्यात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव असल्याचे दिसून येईल. शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर व मन अस्वस्थ राहील. अप्रिय घटनांतून आपले मन दुःखी होईल. आणखी वाचा