Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ३० मे २०२२: मकर राशीच्या लोकांना मित्रांकडून लाभ होणार, प्रेमातही यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 07:34 IST2022-05-30T07:30:58+5:302022-05-30T07:34:41+5:30

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope Todays zodiac astrology 30 May 2022 Capricorn people will get benefit from friends will also succeed in love know more | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ३० मे २०२२: मकर राशीच्या लोकांना मित्रांकडून लाभ होणार, प्रेमातही यश मिळेल

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ३० मे २०२२: मकर राशीच्या लोकांना मित्रांकडून लाभ होणार, प्रेमातही यश मिळेल

मेष: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद - विवादा पासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या - पिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते.  अधिक वाचा

वृषभ: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस फायद्याने भरलेला आहे. आज आपण शरीर व मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल.  अधिक वाचा

मिथुन: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या उक्ती व कृती मुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. विशेषतः नेत्रविकार त्रास देतील. अधिक वाचा

कर्क: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल.  अधिक वाचा

सिंह: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपणास प्रत्येक कामात उशीरा यश मिळेल. कार्यालयात किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव होईल. अधिक वाचा

कन्या: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. त्यांच्या स्वास्थ्याची चिंता सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी आपला वाद होईल. अधिक वाचा

तूळ: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्या मुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल.  अधिक वाचा

वृश्चिक: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल. अधिक वाचा

धनु: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे . घरात आनंदाचे वातावरण राहील. नोकर व सहकारी आपणाला मदत करतील.  अधिक वाचा

मकर: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज कला व साहित्य क्षेत्रात असणार्‍या व्यक्ती त्या क्षेत्रात विशेष कामगीरी करतील. आपल्या रचनात्मक व सृजनशील शक्तींचा इतरांना परिचय द्याल. प्रेमिकांना परस्परांत गाढ प्रेमाचा अनुभव येईल. अधिक वाचा

कुंभ: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज स्वभाव जास्त हळवा बनल्याने मानसिक अस्वास्थ्य राहील. आर्थिक बाबींचे नियोजन कराल. आईकडून अधिक प्रेमाचा वर्षाव झाल्याचा अनुभव येईल. स्त्रिया सौंदर्य - प्रसाधने, वस्त्र, अलंकार यांवर जास्त खर्च करतील. अधिक वाचा

मीन: आज चंद्र रास बदलून वृषभ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल.अधिक वाचा

Web Title: Today Daily Horoscope Todays zodiac astrology 30 May 2022 Capricorn people will get benefit from friends will also succeed in love know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app