Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ११ जून २०२२: आज प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल; आजारपणावर अधिक खर्च होईल, संयमाने बाळगा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 07:48 IST2022-06-11T07:37:38+5:302022-06-11T07:48:32+5:30

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope - June 11, 2022: Today we have to face adversity; Sickness will cost more, be patient in pisces horoscope | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ११ जून २०२२: आज प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल; आजारपणावर अधिक खर्च होईल, संयमाने बाळगा!

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ११ जून २०२२: आज प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल; आजारपणावर अधिक खर्च होईल, संयमाने बाळगा!

मेष- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. आणखी वाचा

वृषभ- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज शरीर व मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज ग्लानीमुळे आपले मन दुःखी राहील. प्रफुल्लता, स्फूर्ती व आनंद यांचा अभाव दिसून येईल. कुटुंबीयांशी मतभेद संभवतात. पैसा खर्च होईल व कामात अपयश येईल. भोजन वेळेवर मिळणार नाही. आणखी वाचा

सिंह- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्या कडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. आणखी वाचा

कन्या- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

तूळ- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थितपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आणखी वाचा

वृश्चिक- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एखाद्याशी वाद सुद्धा संभवतात. आपल्या वक्तव्याने गैरसमज पसरण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट व मानसिक चिंता यामुळे त्रस्त व्हाल. आणखी वाचा

धनु- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल. आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. आणखी वाचा

मकर- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्याने पदोन्नती संभवते. आणखी वाचा

कुंभ- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. मानसिक स्वास्थ्य मात्र चांगले राहील. शरीरात स्फूर्ती कमी असल्याने काम करण्यात उत्साह वाटणार नाही. आणखी वाचा

मीन- आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. आणखी वाचा

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope - June 11, 2022: Today we have to face adversity; Sickness will cost more, be patient in pisces horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app