Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ जानेवारी २०२३: आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता; मानसिक प्रसन्नता जाणवेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 07:34 IST2023-01-22T07:20:34+5:302023-01-22T07:34:52+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope, January 22, 2023: Chance of financial gain today; You will feel mental happiness, you will overcome your rivals...! | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ जानेवारी २०२३: आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता; मानसिक प्रसन्नता जाणवेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल...!

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ जानेवारी २०२३: आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता; मानसिक प्रसन्नता जाणवेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल...!

मेष- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. आणखी वाचा

वृषभ- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने काळजी वाटेल. आणखी वाचा

मिथुन- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. आणखी वाचा

कर्क- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा

सिंह- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाच्या व्याधी त्रास देतील. दुपार नंतर घरात आनंद- उत्साहाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभ संभवतो. आणखी वाचा

कन्या- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव राहील. सामाजिक स्तरावर मानहानी संभवते. धनहानी सुद्धा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा

तूळ- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान- सन्मान मिळतील. दुपार नंतर मात्र मन उदास होईल. आणखी वाचा

वृश्चिक- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. नियोजित काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहील. दुपार नंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा

धनु- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. आणखी वाचा

मकर- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. आणखी वाचा

कुंभ- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपार नंतर प्रकृती बिघडेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. आणखी वाचा

मीन- चंद्र धनु राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope, January 22, 2023: Chance of financial gain today; You will feel mental happiness, you will overcome your rivals...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app