आजचे राशीभविष्य - १३ जून २०२२: आजचा दिवस लाभदायी; नवीन काम अन् एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 07:50 IST2022-06-13T07:24:34+5:302022-06-13T07:50:16+5:30

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's horoscope - 13 June 2022: Today is a profitable day; It is advisable to avoid new work and important decisions today In libra Horoscope | आजचे राशीभविष्य - १३ जून २०२२: आजचा दिवस लाभदायी; नवीन काम अन् एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील

आजचे राशीभविष्य - १३ जून २०२२: आजचा दिवस लाभदायी; नवीन काम अन् एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील

मेष- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. आणखी वाचा

वृषभ- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रां कडून आनंददायी बातम्या मिळतील. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा

कर्क- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता व उद्वेग राहील. आणखी वाचा

सिंह- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आपल्या वक्तव्याने गैरसमज वाढतील व आपले मन उदास होईल. आणखी वाचा

कन्या- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. मित्र व स्वकीयांशी सुसंवाद साधू शकाल. आणखी वाचा

तूळ- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील. आणखी वाचा

वृश्चिक- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आणखी वाचा

धनु- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आरोग्य बिघडेल. आणखी वाचा

मकर- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर - सट्टा ह्यात धन लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा

मीन- आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा

Web Title: Today Daily Horoscope: Today's horoscope - 13 June 2022: Today is a profitable day; It is advisable to avoid new work and important decisions today In libra Horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app