Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ जून २०२२: आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता; मानसिक चिंताही राहील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 07:15 IST2022-06-06T07:12:56+5:302022-06-06T07:15:29+5:30

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope - 06 June 2022: Possibility to hurt your ego by having an argument today; There will be mental anxiety too! | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ जून २०२२: आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता; मानसिक चिंताही राहील!

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ जून २०२२: आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता; मानसिक चिंताही राहील!

मेष- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. अधिक वाचा

वृषभ- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. अधिक वाचा

मिथुन- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकारकडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. अधिक वाचा

कर्क- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. अधिक वाचा

सिंह- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. अधिक वाचा

कन्या- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. अधिक वाचा

तूळ- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. अधिक वाचा

वृश्चिक- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. अधिक वाचा

धनु- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. अधिक वाचा

मकर- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. अधिक वाचा

कुंभ- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. अधिक वाचा

मीन- आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. अधिक वाचा

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope - 06 June 2022: Possibility to hurt your ego by having an argument today; There will be mental anxiety too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app