आजचे राशीभविष्य: धनप्राप्तीचे योग, विरोधकांवर मात कराल; यश-कीर्तीचा आनंदी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 06:33 AM2024-03-30T06:33:25+5:302024-03-30T06:58:47+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 30 march 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य: धनप्राप्तीचे योग, विरोधकांवर मात कराल; यश-कीर्तीचा आनंदी दिवस

आजचे राशीभविष्य: धनप्राप्तीचे योग, विरोधकांवर मात कराल; यश-कीर्तीचा आनंदी दिवस

मेष: आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ, रहस्यमय विद्या ह्याची गोडी लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा त्रास होईल. शक्यतो नवीन कार्य सुरू करू नका. आणखी वाचा 

वृषभ: आज आपणास वैवाहिक जवळीक साधता येईल. कुटुंबीयांसह सामाजिक समारंभासाठी बाहेर फिरणे किंवा सहलीला जाणे झाल्याने वेळ आनंदात जाईल. प्रसन्नता वाटेल. सार्वजनिक जीवनात यश व कीर्ती मिळेल. व्यापारी आपल्या व्यापारात विकास करू शकतील. भागीदारीत लाभ होईल. अचानक धनलाभ होईल. विदेशातून बातम्या मिळतील. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य उत्तम राहील. कामात यश व कीर्ती लाभेल. इतरांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवून मितभाषी राहिल्यास मतभेदाचे प्रसंग उदभवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आवश्यक तेवढाच खर्च कराल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होतील. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस शांततेत घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उद्विग्नता राहील. अचानक पैसा खर्च होईल. प्रेमीजनांत वाद-विवाद होऊन रुसवे- फुगवे होतील. नवीन कार्यारंभ अथवा प्रवास न करणे हितावह राहील. आणखी वाचा 

सिंह: आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल. नोकरीत जपून राहा. आणखी वाचा 

कन्या: आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधात सौहार्द राहील. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल. आणखी वाचा 

तूळ: आज आपली मानसिकता नकारात्मक राहील. रागाच्या भरात वाणीवर संयम न राहिल्याने कुटुंबीयांशी मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मनात ग्लानी निर्माण होईल. अवैध प्रवृत्तीत सहभागी होऊ नये. विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येतील. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल. मित्र व स्नेही यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. मंगल कार्याला उपस्थिती लावाल. धनलाभ व प्रवास संभवतात. दांपत्य जीवनात प्रसन्नता अनुभवाल. आणखी वाचा 

धनु: आज आपल्या रागामुळे कुटुंबीय व इतर लोकांशी आपले संबंध दुरावतील. आपले बोलणे व वागणे हे एखाद्या वादाचे कारण ठरेल. न्यायालयीन कामकाजात दक्षतेने पाऊल उचलावे. निरुपयोगी कामांवर आपली शक्ती खर्च होईल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. व्यापार्‍यांची व्यापारात व नोकरदारांची नोकरीत प्राप्ती वाढेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल. आणखी वाचा 

कुंभ: आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक उत्साह जाणवेल. बढती व धनप्राप्ती संभवते. कौटुंबिक जीवन आनंदी राहून आपली मान-प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा 

मीन: आजच्या दिवसाची सुरवात भीती व उद्विग्नता ह्याने होईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. नशिबाची साथ मिळणार नाही. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. संतती हे आजच्या चिंतेचे प्रमुख कारण राहील. अकारण पैसा खर्च होईल. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 30 march 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app