Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य- 3 सप्टेंबर 2022: वृषभसाठी कौटुंबिक आनंदाचा तर सिंह राशीला धनलाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 07:37 IST2022-09-03T07:36:22+5:302022-09-03T07:37:18+5:30

Today Daily Horoscope 3 September 2022 : कसे असेल तुमचे आजचे राशीभविष्य? जाणून घ्या, सविस्तर....

Today Daily Horoscope 3 September 2022 A day of family happiness for Taurus and wealth gain for Leo | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य- 3 सप्टेंबर 2022: वृषभसाठी कौटुंबिक आनंदाचा तर सिंह राशीला धनलाभाचा दिवस

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य- 3 सप्टेंबर 2022: वृषभसाठी कौटुंबिक आनंदाचा तर सिंह राशीला धनलाभाचा दिवस

मेष: आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान होतील. दुपारनंतर मात्र आपणास संयमित राहावे लागेल. नव्या ओळखी विचार पूर्वक कराव्यात. आणखी वाचा...


वृषभ: आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. आणखी वाचा...


मिथुन: आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. आणखी वाचा...


कर्क: आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा...


सिंह: आज चंद्र तूळ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. आणखी वाचा...


कन्या: आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा...


तूळ: आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. त्यामुळे निर्णय घेणे अवघड होईल. आणखी वाचा...


वृश्चिक: आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा...


धनु: आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र प्रकृतीस त्रास संभवतो. आणखी वाचा...


मकर: आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा...


कुंभ: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. दुपार नंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. आणखी वाचा...


मीन: आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणार्‍या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा...

Web Title: Today Daily Horoscope 3 September 2022 A day of family happiness for Taurus and wealth gain for Leo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app