Today Daily Horoscope: २८ जून २०२४: कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल, मनातील चिंतेचे ढग दूर होतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2024 07:36 IST2024-06-28T07:35:35+5:302024-06-28T07:36:03+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 28 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Today Daily Horoscope: २८ जून २०२४: कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल, मनातील चिंतेचे ढग दूर होतील!

Today Daily Horoscope: २८ जून २०२४: कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल, मनातील चिंतेचे ढग दूर होतील!

मेष:  आजचा दिवस अस्वास्थ्य व त्रासाचा आहे. ताप, सर्दी, खोकला ह्यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. आणखी वाचा 

वृषभ:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदाचे सुखद क्षण अनुभवू शकाल. एखादा प्रवास होऊन त्यातून काही लाभदायी नवीन संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा 

मिथुन:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. आणखी वाचा 

कर्क:  आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आणखी वाचा 

सिंह:  आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल.  आणखी वाचा 

कन्या:  आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा 

तूळ:  आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक:  आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील. स्त्रियांना माहेरहून चांगली बातमी समजेल.  आणखी वाचा 

धनु:  आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. कल्पना जगात विहार कराल.  आणखी वाचा 

मकर:  आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. छातीत वेदना होतील. शांत झोप मिळणार नाही. सामाजिक मानहानी होण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा 

कुंभ:  मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा 

मीन:  आनंद, उत्साह व प्रसन्न तन - मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा.  आणखी वाचा 

Open in app

Web Title: today daily horoscope 28 june 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.