आजचे राशीभविष्य - 26 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक, प्रकल्पात यश मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 07:19 IST2023-05-26T07:18:52+5:302023-05-26T07:19:31+5:30
Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - 26 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक, प्रकल्पात यश मिळेल
मेष- तुमचा उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. परिष्ठांकडून चांगले सहकार्य व मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे तुमचा कामाचा ताण कमी होईल. आपल्या भावी योजना इतरांना सांगत बसू नका. मनात सकारात्मक विचार राहतील. नवीन करून दाखवण्याची उर्मी येईल.
वृषभ- नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. अनेक दिवसापासून वाट पाहत असलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. आवडते छंद जोपासाल.
मिथुन- आपण हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. लोकांचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आवडीच्या क्षेत्रातील कामात मन रमेल, व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.
कर्क- आपण मोठा उत्साहाने एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन कराल. मात्र ऐनवेळी काही लोक खोळंबा करतील. त्यामुळे तुमचा हिरमोड होईल. पण संयम बाळगला तर अडचणी आपोआप दूर होतील आणि आपणास यश मिळेल.
सिंह- आपल्यावर कामाचा खूप ताण राहील. कितीही कष्ट केले तरी कामे आटोक्यात येणार नाहीत. त्यामुळे कामाची यादी बनवून कोणत्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे, ते ठरवा. कामाना विलंब होत असला तरी यश शेवटी तुमचेच आहे.
कन्या- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. आपली कामे गती घेतील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. मनात सकारात्मक विचार राहतील. हाती घेतलेल्या प्रकल्पात यश मिळेल. मनात आशादायी विचार राहतील.
तूळ - तुमचा सल्ला इतरांना उपयुक्त ठरेल. एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. तुमचे निर्णय योग्य वरतील. छोटी माणसे पण कधी कधी मोठी मदत करतात, हे कळेल. नवीन ओळखीमुळे फायदे होतील. काहीना प्रवास घडून येतील.
वृश्चिक- जनसंपर्क दांडगा राहील. तुमचा अनुभव कामी येईल. महत्त्वाचे निरोप येतील, मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. त्यात तुमच्या कौशल्याचा उपयोग होईल. लोक तुमची प्रशंसा करतील. काही मनासारख्या घटना घडतील. समाजात तुमचा गौरव होईल.
धनू- आपल्या समोर काही अडचणी असतील. मात्र कुणालाही न दुखावता, गोड शब्दात बोलून मार्ग काढणे ठीक राहील. मनात सकारात्मक विचार ठेवा. प्रवासात दगदग होईल. थोडे सतर्क राहा. आर्थिक आवक चांगली राहील. आवडते छंद जोपासाल.
मकर- आपल्या प्रयत्नांना यश मिळेल. लोकाचे चांगले सहकार्य मिळेल. ओळखीचे फायदे होतील. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल. जीवनसाथीचे मन मोडू नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.
कुंभ- महत्त्वाच्या बाबी इतरांना सांगू नका. लोक अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. योजनाबद्ध पद्धतीने व फार गवगवा न करता कामे सुरू ठेवा. फार दगदग होईल अशी कामे करू नका. ज्येष्ठ मंडळीचा मान राखा.
मीन-मनात आनंदी विचार राहतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. जवळच्या लोकांसमवेत सहलीला जाऊन याल तुमची गोपनीय माहिती इतरांना सांगू नका. समाजात तुमचा मान वाढेल.
- विजय देशपांडे ज्योतिषविशारद)