आजचे राशीभविष्य: हरवलेली वस्तू सापडेल; आर्थिक लाभ, सुख-समाधान-सौभाग्याचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 07:06 IST2024-12-25T06:55:14+5:302024-12-25T07:06:04+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य: हरवलेली वस्तू सापडेल; आर्थिक लाभ, सुख-समाधान-सौभाग्याचा दिवस
मेष: आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याच बरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार व अती उत्साहाला आवर घालावा लागेल. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश व लाभ मिळेल. आज शक्यतो बौद्धिक चर्चा करताना वाद टाळून समाधानी वृत्तीचा स्वीकार करणे उचित ठरेल. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. मानसिक दृष्टया आनंदात राहाल. आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा
मिथुन: आज संतती व वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद - विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च व नुकसान होण्याची शक्यता आहे. नवीन कार्यारंभ व प्रवास शक्यतो टाळा. आणखी वाचा
कर्क: आज सांभाळून राहावे लागेल. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता लाभण्यासाठी आज प्रयत्न करावे लागतील. त्रास संभवतो. कुटुंबियांशी उग्र चर्चा किंवा वाद झाल्याने मन दुःखी होईल. पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होईल. सामाजिक मानहानी संभवते. आणखी वाचा
सिंह: आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी - पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. जवळचा प्रवास घडेल. प्रगतीच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदित करेल. प्रेमपूर्ण संबंधाचे महत्व लक्षात येईल. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा
कन्या: आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. बौद्धिक चर्चा करताना भांडण होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवासाची शक्यता आहे. आयात - निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल. आणखी वाचा
तूळ: सांप्रत काळी चांगल्या प्रकारे आर्थिक नियोजन करू शकाल. आज कलात्मक व सृजनात्मक शक्ती सर्वोत्तम राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व आत्मविश्वासाने कामे पूर्ण कराल. भागीदारांचे विचार पटतील. मौज-मस्ती व मनोरंजनावर खर्च कराल. दांपत्य जीवनात जवळीक वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक: आज हर्षोल्हास व मनोरंजनावर पैसे खर्च कराल. मानसिक चिंता व शारीरिक तगमग यांमुळे त्रासून जाल. वाणीवर संयम नसल्याने भांडणतंटा होऊ शकतो. कुटुंबीय व स्नेही यांच्याशी पटणार नाही. आणखी वाचा
धनु: आज प्रेमाचा सुखद अनुभव मिळण्याचे सौभाग्य प्राप्त होईल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक दृष्टया आजचा दिवस लाभदायक आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. मित्रांकडून लाभ होईल. उत्पन्नाची साधने वाढतील. व्यापारात वाढ होऊन लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. मंगलकार्ये होतील. उत्तम भोजनाचा आस्वाद मिळेल. आणखी वाचा
मकर: आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत आपल्या कष्टाचे चीज होईल. घर, कुटुंब व संततीच्या बाबतीत आनंद व समाधानाची भावना राहील. व्यावसायिक कामा निमित्त धावपळ वाढेल. नोकरीत बढती मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होतील. आणखी वाचा
कुंभ: आज आपणास अस्वास्थ्य जाणवेल. पण मानसिक दृष्टया शांतता जाणवेल. कामात उत्साहाचा अभाव राहील. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी वाद करणे योग्य ठरणार नाही. मौज - मजेसाठी जास्त खर्च कराल. परदेशगमनाची शक्यता वाढेल. तसेच परदेशातून आनंददायी बातम्या मिळतील. संततीची काळजी लागून राहील. आणखी वाचा
मीन: आज काही प्रमाणात प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणावर अधिक खर्च होईल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अचानक धनलाभ होऊन आपल्या मनावरील भार काही अंशी हलका होईल. व्यापार्यांची जुनी येणी वसूल होतील. आणखी वाचा