आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अखंड सावध राहा, वादविवाद टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 07:16 AM2024-03-24T07:16:57+5:302024-03-24T07:19:43+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 24 march 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अखंड सावध राहा, वादविवाद टाळा

आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अखंड सावध राहा, वादविवाद टाळा

मेष: साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपारनंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. शत्रू व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी आपला संघर्ष होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा 

वृषभ: प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना अनुकूल दिवस आहे. सृजनशीलता वाढेल. हातून एखादे परोपकारी कार्य घडेल. आणखी वाचा 

मिथुन: आजचा दिवस सुखा-समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपारनंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. भोजनाची वेळ पाळू शकणार नाही. आज आपण अधिक हळवे व्हाल. घरातील वातावरण प्रतिकूल राहील. जमीन वा इतर कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा. जास्त भावनाशील होऊ नका. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपारनंतर सहलीचा बेत ठरवू शकाल. सहकाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. प्रकृती उत्तम राहील. मनाच्या प्रसन्नतेमुळे दिवसाचा आनंद वाढेल. आणखी वाचा 

सिंह: आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठ्या लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. खर्च नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा. दूर राहणारे स्वकीय व मित्र यांच्याशी खूप कालावधीनंतर होणारा एखादा व्यवहार आज आनंददायी व लाभदायी ठरेल. आणखी वाचा 

कन्या: भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्राप्तीच्या प्रमाणात खर्च वाढेल. दुपारनंतर वडील व वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मनातील चिंता कमी होईल व मन आनंदी बनेल. आणखी वाचा 

तूळ: आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल. मित्रांकडून विशेष लाभ होतील. व्यापारात नफा संभवतो. दुपारनंतर मात्र हळुवारपणा वाढल्याने मन व्यग्र बनेल. काळजीमुळे मनस्वास्थ्यावर नकारात्मक प्रभाव पडेल. उक्ती आणि कृती यांत संयम बाळगा. खर्च वाढेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. गृहस्थ जीवनात गोडी राहील. दुपारनंतर मित्रांकडून लाभ होईल. दिवसभर वैचारिक पातळीवर अनिश्चिततेचे मळभ राहील. त्यामुळे अंतिम निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. असे निर्णय शक्यतो दुपारनंतर घेऊ नये. आणखी वाचा 

धनु: आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. कार्य सफल होईल. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी अनुकूल आहे. पित्याकडून लाभ होईल. आणखी वाचा 

मकर: आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो. शक्यतो बाहेरचे खाणे पिणे टाळा. चारित्र्यावर शिंतोडे उडतील असे कार्य करू नका. निरर्थक वाद-विवाद व चर्चा यापासून दूर राहा. आणखी वाचा 

कुंभ: आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचे राहील. दैनंदिन कामात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतो. खूप परिश्रम करुनही अपेक्षित प्राप्ती होणार नाही. आणखी वाचा 

मीन: आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता निर्माण होईल. सामाजिक क्षेत्रात यश मिळणे अवघड होईल. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 24 march 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app