आजचे राशीभविष्य: सरकारी कामात यश, मान-मरातब वाढेल; आर्थिक लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 07:23 AM2024-03-23T07:23:27+5:302024-03-23T07:26:04+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

today daily horoscope 23 march 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | आजचे राशीभविष्य: सरकारी कामात यश, मान-मरातब वाढेल; आर्थिक लाभाचा दिवस

आजचे राशीभविष्य: सरकारी कामात यश, मान-मरातब वाढेल; आर्थिक लाभाचा दिवस

मेष: आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवणे हितावह राहील. मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संततीविषयी काळजी राहील. कामाच्या व्यापामुळे कुटुंबियांना वेळ देऊ शकणार नाही. सरकारी कामात मात्र यश मिळेल. आणखी वाचा 

वृषभ: आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात आर्थिक यश मिळेल. संततीसाठी पैशांची गुंतवणूक करू शकाल. आणखी वाचा 

मिथुन:  आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. गैरसमज दूर होतील. वैचारिक बदल संभवतो. आर्थिक व्यवहारात मात्र सावधानता बाळगावी लागेल. आणखी वाचा 

कर्क: आज नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही. अवैध गोष्टींपासून शक्यतो दूरच राहावे. आणखी वाचा 

सिंह: आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडीलधाऱ्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान-मरातब वाढेल. वाणी व कृती ह्यावर नियंत्रण ठेवणे हितावह राहील. काही कारणाने आपल्या रागाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा 

कन्या: आज एखाद्या व्यक्तीशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. अचानकपणे खर्च उद्भवतील. भांडणापासून दूर राहावे. आणखी वाचा 

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल.  विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. उत्तम भोजन प्राप्ती होईल. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी-व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर खुश होतील. प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. मान व प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढतीही होऊ शकते. कौटुंबिक जीवनात संततीची प्रगती झाल्याने आपले समाधान होईल. आणखी वाचा 

धनु: आज आपली प्रकृती नरम गरम राहील. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. कोणतीही योजना विचारपूर्वक अंमलात आणा. प्रतिस्पर्धी व विरोधक यांच्याशी संभाव्य वाद टाळा. आणखी वाचा 

मकर:  आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. क्रोध तसेच नकारात्मक विचारांवर संयम ठेवावा लागेल. नोकरी- व्यवसायात मात्र अनुकूलता राहील. भागीदारांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा 

कुंभ: प्रत्येक काम आपण आत्मविश्वापूर्वक कराल. प्रवास, सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची व नवीन वस्त्रपरिधान करण्याची संधी लाभेल. भागीदारीतून फायदा होईल. वाहन सौख्य मिळेल. आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास दृढ असेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुखशांती नांदेल. स्वभावातील तापटपणा संयमित ठेवावा लागेल. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा 

 

Web Title: today daily horoscope 23 march 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app