आजचे राशीभविष्य: वेगळाच अनुभव येईल, काम निर्विघ्नपणे होईल; नोकरी-व्यवसायात शुभ फळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 07:01 IST2025-03-21T06:50:14+5:302025-03-21T07:01:01+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य: वेगळाच अनुभव येईल, काम निर्विघ्नपणे होईल; नोकरी-व्यवसायात शुभ फळे
मेष: आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल. शक्यतो नवीन कार्यारंभ करू नये. आणखी वाचा
वृषभ: आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. परदेशात राहण्यार्या संबंधिताकडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला आनंद होईल. अचानक धनलाभ संभवतो. आणखी वाचा
मिथुन: आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातील रागावर आवर घालण्याची मात्र आवश्यकता आहे. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. मित्र व संतती विषयक काळजी राहील. अचानक पैसा खर्च करावा लागेल. वादग्रस्त विषय टाळावेत. शक्य असेल तर प्रवास करू नका. बौद्धिक चर्चेपासून ही दोन हात दूर राहणे उचित ठरेल. आणखी वाचा
सिंह: आज नकारात्मक विचार नैराश्य निर्माण करतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरात विसंवादाचे वातावरण राहील. आई - वडिलांशी मतभेद होतील. जमीन, घर, वाहन खरेदी विषयक कागद पत्रांसंबंधी सावध राहा. भावनेच्या भरात वाहवत जाऊ नका. आणखी वाचा
कन्या: आज अविचाराने कोणतेही काम करण्यापासून स्वतःला जपा. कामात यश तर मिळणारच आहे. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. भावंडे व शेजारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. आर्थिक लाभ होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. समाजात मान - सन्मान मिळेल. चित्तवृत्ती प्रफुल्लित राहील. आणखी वाचा
तूळ: आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानाने राहावे लागेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
वृश्चिक: आज आपण तन - मनाने खुश व ताजेतवाने राहाल. कुटुंबीय व मित्रांसह उत्तम भोजन, प्रवास, मनोरंजन होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. आर्थिक लाभ होईल. मंगल कार्यानिमित्त बाहेर जावे लागेल. आनंददायक बातम्या मिळतील. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उद्भवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. खर्चात वाढ होईल. फुटकळ कामातून मनःशांती भंग पावेल. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस नोकरी - व्यवसाय तथा समाजातील अन्य क्षेत्रांत शुभ फळे देणारा आहे. मित्र व आप्तेष्टांसह फिरावयास जाल. मंगल कार्यात हजेरी लावाल. मैत्रिणी, पत्नी व संतती यांच्याकडून लाभ होईल. विवाहोत्सुक युवक - युवतींचे विवाह ठरतील. प्रवास व सहल होईल. आणखी वाचा
कुंभ: आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पूर्ण झाल्याने आपण खुश व्हाल. नोकरी - व्यवसायात परिस्थिती आपणास अनुकूल राहील व कार्यात यश मिळेल. वडीलधारी व वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी असल्याने कोणत्याही प्रकारच्या मानसिक दडपणातून मुक्त व्हाल. संसारात आनंद वाटेल. धनप्राप्ती तसेच बढती संभवते. आणखी वाचा
मीन: आज नकारात्मक विचार वरचढ होणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. मानसिक अस्वास्थ्य सतावेल. नोकरीत वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीच्या समस्या सतावतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकणार नाही. आज शक्यतो कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आणखी वाचा