Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 07:05 IST2025-10-12T07:01:38+5:302025-10-12T07:05:44+5:30
Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
मेष
आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती होईल व त्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात स्पर्धेचा राहील व त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल... आणखी वाचा
वृषभ
आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्च दरम्यान संघर्ष होऊ शकतो... आणखी वाचा
मिथुन
आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळ पासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल. मित्र व नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ होईल व त्याच बरोबर भेटवस्तूही मिळतील... आणखी वाचा
कर्क
आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आपणास खिन्नता व भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा झाल्याने आपण बेचैन व्हाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात... आणखी वाचा
सिंह
आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गाफील राहिलात तर लाभा पासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडे लक्ष द्यावे. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील... आणखी वाचा
कन्या
आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते... आणखी वाचा
तूळ
आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल. बौद्धिक काम व साहित्य लेखन यात गुंतून राहाल. प्रवासाची संधी मिळेल. परदेशात राहणारे मित्र व सगे सोयरेंची खुशाली समजल्याने आपण आनंदात राहाल... आणखी वाचा
वृश्चिक
आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध व अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील. वेळेवर भोजन मिळणार नाही... आणखी वाचा
धनु
आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा दिवस सुखशांती व आनंदात व्यतित होईल. मित्रांचा सहवास, स्वादिष्ट भोजन, नवे कपडे इत्यादी प्राप्त होतील.भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण वाढेल... आणखी वाचा
मकर
आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल. धनलाभ होईल... आणखी वाचा
कुंभ
आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्याने कोणताही महत्वाचा निर्णय न घेणे हेच हितावह राहील. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने खूप निराशा होईल... आणखी वाचा
मीन
आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज उत्साह व स्फूर्ती यांचा अभाव राहील. मित्र व नातेवाईक यांच्या बरोबर वाद - विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल... आणखी वाचा