Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - १९ जुलै २०२२ : धनु राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, प्रतिस्पर्ध्यांवर कराल मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 07:22 IST2022-07-19T07:22:25+5:302022-07-19T07:22:51+5:30

Todays Horoscope 19 July 2022 : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Rashi Bhavishya Todays Horoscope 19 July 2022 Sagittarius people will get the support of luck and overcome their rivals zodiac sign rashifal | Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - १९ जुलै २०२२ : धनु राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, प्रतिस्पर्ध्यांवर कराल मात

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - १९ जुलै २०२२ : धनु राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ, प्रतिस्पर्ध्यांवर कराल मात

मेष - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपणास मोठा आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धि मिळेल. व्यापारात लाभ होईल. एखाद्या सहलीचे यशस्वी नियोजन करू शकाल.  आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यावसायिक स्थिती आपणास अनुकूल राहील. आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. कामे सहजपणे पूर्ण होऊ शकल्याने काही लाभ पदरी पडेल. आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्याने आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. आणखी वाचा

कर्क - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज मन अशांत व निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्ये व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपार नंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्याने मनःस्वास्थ्य मिळेल. आणखी वाचा

सिंह - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र व स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपार नंतर मात्र अती विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. आणखी वाचा

कन्या - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. आणखी वाचा

तूळ - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. आणखी वाचा

धनु - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील व प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपार नंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. आणखी वाचा

मकर - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद - विवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील. आणखी वाचा

कुंभ - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपले मन आनंदी राहील. मनात नकारात्मक विचार येतील. आपल्या कृती संयमित ठेवाव्या लागतील. अचानकपणे खर्च उदभवतील. निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल.  आणखी वाचा

मीन - आज चंद्र कुंभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आर्थिक देवाण- घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात व गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट- कचेरी प्रकरणात सावध राहावे लागेल. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. आणखी वाचा

Web Title: Rashi Bhavishya Todays Horoscope 19 July 2022 Sagittarius people will get the support of luck and overcome their rivals zodiac sign rashifal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app