Rahu Shukra Sanyog 2022 : राहू आणि शुक्राची युती होतेय; १८ जूनपर्यंत 'या' तीन राशींनी राहायला हवे सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 11:37 IST2022-05-27T11:36:35+5:302022-05-27T11:37:13+5:30

Rahu Shukra Sanyog 2022: शनीनंतर मार्गात अडथळे घालणारे दोन ग्रह म्हणजे राहू आणि केतू; यावेळी मात्र राहू आणि शुक्र एकत्र आल्याने येणाऱ्या अडचणींबद्दल जाणून घेऊ.

Rahu Shukra Sanyog 2022: Rahu and Venus coming together; Beware of 'these' three zodiac signs till June 18! | Rahu Shukra Sanyog 2022 : राहू आणि शुक्राची युती होतेय; १८ जूनपर्यंत 'या' तीन राशींनी राहायला हवे सावध!

Rahu Shukra Sanyog 2022 : राहू आणि शुक्राची युती होतेय; १८ जूनपर्यंत 'या' तीन राशींनी राहायला हवे सावध!

२३ मे रोजी शुक्राने मीन राशी सोडली आणि मेष राशीत प्रवेश केला. जिथे तो १८ जूनपर्यंत राहणार आहे. शुक्राच्या आगमनापूर्वी राहू ग्रह आधीच मेष राशीत बसला आहे. अशा स्थितीत राहू आणि शुक्राच्या संयोगाने चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते. ज्योतिषांच्या मते हा योग अनेक राशींसाठी धोकादायक ठरू शकतो. अशा स्थितीत सर्व राशीच्या जातकांनी नवग्रह स्तोत्राचे श्रवण-पठण करणे हितावह ठरेल. मात्र पुढील तीन राशीच्या जातकांनी विशेष काळजी घेतलली बरी. त्यांच्यासाठी ज्योतिष शास्त्राचे हे मार्गदर्शन!

कर्क : शुक्राचे संक्रमण तुमच्या कुंडलीच्या दशम स्थानात असेल जिथे राहू देखील आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील. दैनंदिन कामातही अडचणींना सामोरे जावे लागेल. त्यामुळे कार्यालयातील कोणतेही काम काळजीपूर्वक करावे. याशिवाय वैवाहिक जीवनात कलह होऊ नये म्हणून तुमच्या बाजूने वाद टाळा आणि डोकं शांत ठेवा. 

कन्या : तुमच्या राशीतून अष्टम स्थानात शुक्राचे संक्रमण होणार आहे, जिथे राहू आधीच बसला आहे. हा काळ कठोर परिश्रमाचा असू शकेल. त्याहून वाईट गोष्ट म्हणजे केलेल्या कष्टाचा मोबदला किंवा श्रेय मिळेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे निरपेक्ष बुद्धीने काम करा त्याच्या फळाची अपेक्षा सोडून द्या. यासोबतच आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. विशेषतः मधुमेहाच्या रोग्यांनी तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे. 

मीन : शुक्राचे संक्रमण या राशीच्या दुसऱ्या घरात आहे, जिथे राहू आधीच येऊन पोहोचला आहे. या काळात शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. आर्थिक अडचणी येऊ शकतात. जास्त खर्चामुळे पैसे जमा होण्यात अडचणी येतील.जमीन, इमारत, वाहन इत्यादी कामात अडथळे येऊ शकतात. यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत राहतील. तुम्ही मात्र रागावर नियंत्रण ठेवा, विनाकारण वादात पडू नका. आरोग्याची काळजी घ्या. 

Web Title: Rahu Shukra Sanyog 2022: Rahu and Venus coming together; Beware of 'these' three zodiac signs till June 18!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app