Pushkaraj Gem Benefits: 'या' दोन राशींसाठी पुष्कराज ठरते वरदान, तर सहा राशींना करते नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 17:22 IST2022-07-12T17:22:23+5:302022-07-12T17:22:35+5:30
Pushkaraj Gem Benefits: गुरुवारी हे रत्न परिधान केल्यास अधिक लाभ होतो, त्याबरोबरच दिलेला मंत्र म्हणायला विसरू नका!

Pushkaraj Gem Benefits: 'या' दोन राशींसाठी पुष्कराज ठरते वरदान, तर सहा राशींना करते नुकसान!
ज्योतिषशास्त्रात रत्नांचे विशेष महत्त्व मानले जाते. प्रत्येक रत्न कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधित असते. जर एखादे रत्न एखाद्या व्यक्तीला अनुकूल असेल तरच ते भाग्य बदलू शकते. कोणीही कोणतेही रत्न धारण करून उपयोग नाही. तसे केल्याने फायदा होणार नाहीच, उलट नुकसान होण्याची शक्यता असू शकते. आज आपण गुरु ग्रहाचे रत्न पुष्कराज बद्दल जाणून घेणार आहोत. जन्मकुंडलीतील सर्वात शुभ ग्रह असलेल्या बृहस्पतिच्या अनुकूलतेसाठी हे सोनेरी रंगाचे रत्न घातले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, पुष्कराज धनु आणि मीन राशीसाठी सर्वात शुभ आहे. कारण या दोन्ही राशींचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि पुष्कराज हे गुरूचे रत्न आहे. हे रत्न या दोन्ही राशींसाठी वरदान ठरू शकते. हे रत्न तुमचा आत्मविश्वास वाढवते. तसेच आर्थिक स्थिती सुधारते. तुमची प्रतिभा वाढवते. नोकरी असो वा व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात प्रगती घडवून आणते. आरोग्याच्या दृष्टीनेही हे रत्न लाभदायक ठरते. तसेच या रत्नाच्या प्रभावामुळे वैवाहिक जीवनातील अडथळेही दूर होतात. धनु आणि मीन व्यतिरिक्त, पुष्कराज कर्क आणि सिंह राशीसाठी सर्वोत्तम ठरते.
केव्हा आणि कसे घालावे : हे रत्न धारण करण्यासाठी गुरुवार हा सर्वात शुभ दिवस आहे. या रत्नाची अंगठी अशा प्रकारे बनवा की ती परिधान करताना तुमच्या बोटाच्या त्वचेला रत्नाचा स्पर्श होईल. गुरुवारी सकाळी आंघोळ केल्यानंतर ही रत्न जडलेली अंगठी दूध आणि गंगाजलाने अभिषेक करून पाण्याने स्वच्छ करून आपल्या तर्जनी वर घाला. अंगठी घालताना ‘ओम ब्रह्म बृहस्पतिये नमः’ या मंत्राचा जप करा!
पुढील राशीच्या लोकांनी पुष्कराज घालणे टाळावे: वृषभ, मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय पुष्कराज घालू नये. कारण या राशींसाठी हे रत्न शुभ मानले जात नाही. तसेच हे रत्न धारण करताना हे लक्षात ठेवा की याला पन्ना, गोमेद, नीलम, हिरा आणि लसणी घालू नका, अन्यथा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.