Numerology : 'या' तारखेला जन्माला आलेले भाग्यवान लोक कमी वयात श्रीमंती उपभोगतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 11:43 IST2022-06-11T11:42:37+5:302022-06-11T11:43:48+5:30

Numerology: बोलण्यात, वागण्यात तीक्ष्ण, हुशार आणि त्याबळावर झटपट श्रीमंती उपभोगणारे जातक ठराविक तारखेला जन्माला आले असतात, असा अंकशास्त्राचा अभ्यास आहे. 

Numerology: Lucky people born on this date enjoy wealth at an early age! | Numerology : 'या' तारखेला जन्माला आलेले भाग्यवान लोक कमी वयात श्रीमंती उपभोगतात!

Numerology : 'या' तारखेला जन्माला आलेले भाग्यवान लोक कमी वयात श्रीमंती उपभोगतात!

व्यक्तीच्या कुंडलीच्या आधारे जसे ज्योतिष शास्त्र भाकीत करते, तसे व्यक्तीच्या जन्मतारखेवरून अंकशास्त्र भाकीत करते. त्यासाठी मूलांक काढला जातो. हा मूलांक जन्मतारखेवरून काढला जातो. मूलांक ही मूळच्या जन्मतारखेची बेरीज आहे. उदाहरणार्थ, कोणत्याही महिन्याच्या 5, १४ आणि २३ तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा मूलांक ५ असेल. अंकशास्त्रानुसार, मूलांक ५ चे जातक खूप भाग्यवान असतात. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती असते आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांना हे सर्व ऐहिक सुख कमी वयातच मिळते. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया. 

लहानपणापासून पैसे कमवायला सुरुवात: 

हे लोक खूप मेहनती असतात आणि आपल्या संवाद कौशल्याने लोक जोडतात. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. बुध ग्रह या लोकांना तर्कशास्त्र, बुद्धिमत्ता, भाषण कौशल्ये देतो. तसेच हे लोक व्यवसाय करण्यात निष्णात असतात. ते व्यवसायात झटपट यश मिळवतात आणि लहान वयातच मजबूत बँक बॅलन्स साठवतात. हे लोक मोठे उद्योगपती होतात.

तसेच कमी खर्चातही मोठा व्यवसाय करतात. प्रत्येक समस्येला शांतपणे हाताळण्याची क्षमता या लोकांमध्ये असते. ते आपल्या बुद्धिमत्तेने आणि तर्काने प्रत्येक समस्येवर उपाय शोधतात. असे लोक गरीब घरात जन्म घेऊनही स्वतःहून भरपूर संपत्ती कमावतात.

संगीतात प्रचंड रस

मूलांक ५ असलेल्या लोकांना संगीतात खूप रस असतो. त्यांच्याकडे वाद्ये आणि संगीताचा चांगला संग्रह असतो. संगीतामुळे त्यांचे मन शांत असते आणि शांत विचारांमुळे त्यांचे निर्णय सहसा चुकत नाहीत. त्यामुळे हे लोक यशस्वी आयुष्य जगतात. तुमचा मूलांक ५ नसेल तर नाराज होऊ नका, यशस्वी होण्यात नशिबाचा हात असला तरी प्रयत्नाने नशीब बदलता येते आणि घडवताही येते यावर विश्वास ठेवा आणि कामाला लागा!

Web Title: Numerology: Lucky people born on this date enjoy wealth at an early age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app