June Astrology: जून महिन्यात 'या" ४ राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा; अडलेली कामे मार्गी लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 07:00 IST2022-06-03T07:00:00+5:302022-06-03T07:00:02+5:30

June Astrology: जून महिन्यात अनेक ग्रह आपला वेग बदलतील. यामुळे जून महिन्यात ४ राशींचा भाग्योदय होईल आणि त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहील. 

June Astrology: Maa Laxmi grace will be on 'these' 4 zodiac signs in the month of June! | June Astrology: जून महिन्यात 'या" ४ राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा; अडलेली कामे मार्गी लागणार!

June Astrology: जून महिन्यात 'या" ४ राशींवर होणार लक्ष्मी मातेची कृपा; अडलेली कामे मार्गी लागणार!

नवीन इंग्रजी वर्षाचे पाच महिने संपून सहाव्या महिन्यात आपण पदार्पण केले. आधीच्या चार महिन्यात तुमची मनासारखी प्रगती झाली नसेल तर हा काळ तुमच्यासाठी भाग्योदयाचा ठरू शकतो. त्यासाठी पुढील चार राशीत तुमची रास समाविष्ट आहे का तपासून घ्या!

मेष : जून महिन्यात तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जुनी येणी वसूल करता येतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. नोकरीत कार्यक्षेत्र वाढवता येईल. यासोबतच तुम्हाला नवीन पदाची जबाबदारीही मिळू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी जून महिना चांगला जाणार आहे.

मिथुन: नवीन व्यवसायासाठी काही योजना प्रत्यक्षात येऊ शकतात. बौद्धिक कामे उत्पन्नाचे साधन बनू शकतात. रागाची तीव्रता कमी होईल. मित्राच्या मदतीने व्यवसायाला गती मिळेल. नवीन व्यवसायासाठी काही योजना प्रत्यक्षात येऊ शकतात.

वृश्चिक: या महिन्यात कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. तुम्हाला मान सन्मान मिळेल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. लांबचे प्रवास होतील. या महिन्यात तुम्हाला तुमच्या सासरच्या मंडळींकडून भेटवस्तू मिळू शकतात. शैक्षणिक कामावर लक्ष केंद्रित करा. 

मीन: जूनमध्ये वैवाहिक जीवन तुमच्यासाठी आनंदी असेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल, ज्यामुळे तुमच्या आर्थिक प्रगतीवर परिणाम होईल. या महिन्यात तुम्ही नवीन मालमत्ता घेऊ शकता. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. यासोबतच तुमचे रखडलेले कामही पूर्ण होऊ शकते.

Web Title: June Astrology: Maa Laxmi grace will be on 'these' 4 zodiac signs in the month of June!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app