Horoscope: २७ मे चा शुक्रवार ठरणार बाराही राशींसाठी भाग्यकारक; शुक्र प्रदोषाचा करून घ्या लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:36 IST2022-05-26T15:35:58+5:302022-05-26T15:36:21+5:30
Astrology: अनुकूल ग्रहस्थितीचा लाभ करून घेत महादेवाच्या पूजेची जोड देत या दिवसाचा पुरेपूर लाभ घ्या!

Horoscope: २७ मे चा शुक्रवार ठरणार बाराही राशींसाठी भाग्यकारक; शुक्र प्रदोषाचा करून घ्या लाभ!
२७ मे २०२२ रोजी शुक्रवारी प्रदोष व्रत आहे. हे व्रत भगवान शंकराना समर्पित असते. या दिवशी शंकराची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते, असे मानले जाते. याच दिवशी ग्रह नक्षत्रांच्या अनुकूल स्थितीचा लाभ बाराही राशींना होणार असल्यामुळे हा शुक्रवार तुमच्यासाठी भाग्यकारक ठरेल. या ग्रहस्थितीचा लाभ करून घेत महादेवाच्या पूजेची जोड देत या दिवसाचा पुरेपूर लाभ घ्या!
मेष- बौद्धिक कामात विशेष लक्ष द्या खूप लाभ होईल. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी उपलब्ध होतील. संधीचा फायदा घ्या. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या. शुभ वार्ता समजतील.
वृषभ - मनःशांती राहील.आवश्यक तेवढेच बोला अन्यथा कामाच्या ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. उत्पन्न वाढेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आईच्या बाजूने पैसे मिळण्याची शक्यता आहे. परीस्थिती चांगली होईल.
मिथुन - अनेक दिवसांपासून सतावत असलेली अनामिक भीती नष्ट होईल. भावांच्या मदतीने व्यवसाय वाढेल. तणाव टाळा. मित्राचा सल्ला फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
कर्क - तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. मन स्वस्थ राहील.कुटुंबात अनावश्यक वाद टाळा. रुचकर जेवणाची इच्छा पूर्ण होईल. कामाचा बोझा थोडा जास्त असेल पण सहकाऱ्यांची मदत मिळेल. खर्च जास्त होईल. चांगली बातमी मिळेल.
सिंह- मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा. अनावश्यक भांडणे आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्ही काही मालमत्तेसाठी गुंतवणूक करू शकता. भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल. नोकरीत प्रगतीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नही वाढेल. चांगली स्थिती निर्माण होईल.
कन्या : लवकरच कुटुंबीयांबरोबर सहलीची आखणी कराल. धार्मिक स्थळी गेल्याने मनःशांती लाभेल. तसेच भगवंत कृपेने राजकीय क्षेत्रात यश मिळेल. शब्द जपून वापरा आणि सद्यस्थितीत कोणालाही कुठलेही आश्वासन देणे टाळा.
तूळ - पूर्ण दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल, पण संयमाची कमतरता भासू शकते. धीर धरा.अन्यथा उत्पन्नात घट आणि खर्चात वाढ होईल. ओळखीतल्या माणसांनी थकवलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. तणाव टाळा.
वृश्चिक- नोकरीत प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. वाहन सुख देखील प्राप्त होईल.तुमच्यात आत्मविश्वासाची वाढ होईल. स्वावलंबी व्हा. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. आईच्या बाजूने धनलाभ होण्याचा योग आहे!
धनु - नवीन ठिकाणी नोकरीची, कामाची संधी मिळाल्याने मन द्विधा मनःस्थितीत असेल. मात्र नवीन संधी तुम्हाला उज्ज्वल भविष्य देणारी ठरू शकेल. कार्यक्षेत्र वाढेल, मान सन्मान मिळेल. काही काळ कुटुंबाशी विरह सहन करावा लागेल.
मकर - धीर धरा. आळसाचा अतिरेक होईल.नोकरीमध्ये अधिकाऱ्यांशी वाद टाळा. प्रगतीच्या संधी मिळू शकतात. मनःशांती लाभेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. तुम्ही जुन्या मित्राशी पुन्हा संपर्क साधू शकता. तसे करणे तुम्हाला हितावह ठरेल.
कुंभ - मन शांत ठेवून शब्दांवर आळा घातलात तर मोठे वाद टाळू शकता. त्याचा फायदा भविष्यात होईल. नवीन काम मिळेल व उत्पन्नाचे साधनही प्राप्त होईल. संधी दवडू नका.
मीन - संमिश्र घटनांचा दिवस असला तरी कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सहलीला जाऊ शकता. त्यामुळे मन प्रसन्न होईल. कुटुंबीयांचा सहवास मिळेल आणि आपापसातले मतभेद दूर होऊन नाते दृढ होईल.