आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 07:36 IST2025-06-01T07:19:51+5:302025-06-01T07:36:52+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Daily horoscope dainik rashi bhavishya Today's horoscope Sunday 01 June 2025 | आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल

आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल

मेष - आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. आणखी वाचा

वृषभ - आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आणखी वाचा

मिथुन - आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. आणखी वाचा

कर्क - आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आपले मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा 

सिंह - आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. वैवाहिक सुखाचा मनसोक्त आनंद मिळवाल. आणखी वाचा

तूळ - आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्‍यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. आणखी वाचा

वृश्चिक - आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे आपणास हताश बनवेल. आणखी वाचा

धनु - आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. आर्थिक लाभ व मान - सन्मान ह्यात वृद्धी होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास व एखादा प्रवास आपल्या आनंदात भर घालू शकेल. आणखी वाचा

कुंभ - आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील. आणखी वाचा

मीन - आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. आणखी वाचा

Web Title: Daily horoscope dainik rashi bhavishya Today's horoscope Sunday 01 June 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app