राशीभविष्य, ९ एप्रिल २०२५: आर्थिक लाभ होईल, मान-सन्मान होतील पण हट्टीपणावर संयम ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 08:23 IST2025-04-09T08:22:07+5:302025-04-09T08:23:36+5:30

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Daily Horoscope 9 April 2025 lovelife predictions career guidance share market | राशीभविष्य, ९ एप्रिल २०२५: आर्थिक लाभ होईल, मान-सन्मान होतील पण हट्टीपणावर संयम ठेवा!

राशीभविष्य, ९ एप्रिल २०२५: आर्थिक लाभ होईल, मान-सन्मान होतील पण हट्टीपणावर संयम ठेवा!

मेष- आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रम करून सुद्धा कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा

वृषभ- आज आपण प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास व खंबीर मनोबलासह करून त्यात यश मिळवाल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होतील. आणखी वाचा

सिंह- दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. आणखी वाचा

कन्या- दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल. अचानकपणे खर्च उद्भवतील. आणखी वाचा   

तूळ- दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल. घरात पत्नी व संतती ह्यांच्या कडून काही सुखद बातमी मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आणखी वाचा 

धनु- आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती सुद्धा नरम गरम राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. नशीबाची साथ मिळणार नाही. आणखी वाचा 

मकर- आज नोकरी - व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यालयीन कामे कौशल्य पूर्वक कराल. व्यावहारिक व सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे ह्याकडे लक्ष राहील. आणखी वाचा 

कुंभ- आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. आणखी वाचा

Web Title: Daily Horoscope 9 April 2025 lovelife predictions career guidance share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app