आजचे राशीभविष्य, २८ मार्च: आर्थिक लाभ संभवतो, प्रिय व्यक्तीचा सहवास, कामाची प्रशंसा होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 07:46 AM2024-03-28T07:46:18+5:302024-03-28T07:48:15+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Daily horoscope 28 March 2024 Astrology love life prediction career guidance dos donts | आजचे राशीभविष्य, २८ मार्च: आर्थिक लाभ संभवतो, प्रिय व्यक्तीचा सहवास, कामाची प्रशंसा होईल!

आजचे राशीभविष्य, २८ मार्च: आर्थिक लाभ संभवतो, प्रिय व्यक्तीचा सहवास, कामाची प्रशंसा होईल!

मेष: आज आपणास सुखदायी दांपत्य जीवन, हिंडणे - फिरणे व सगळेच मनासारखे मिळू शकेल. आयात - निर्यात व्यापाराशी संबंधितांना लाभ व यश मिळेल. हरवलेली वस्तू परत मिळेल. आणखी वाचा 

वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. ठरवलेली कामे व्यवस्थीत पार पडतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल. मातुल घराण्याकडून आनंदाच्या बातम्या मिळतील. आणखी वाचा

मिथुन: आज सर्वत्र लाभच लाभ आहेत. कौटुंबिक सुख - शांती राहील. पत्नी साठी खर्च करावा लागेल. अविवाहितांचे विवाह ठरतील. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. आणखी वाचा 

कर्क: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळेल. छातीत दुखणे किंवा अन्य विकारामुळे कुटुंबात अशांतीचे वातावरण राहील. स्त्री वर्गाशी मतभेद वा भांडण होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा 

सिंह: आज कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहिल्याने आपणास प्रसन्न वाटेल. भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकेल. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा 

कन्या: आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड वाणी व न्यायप्रिय व्यवहार ह्यामुळे लोकप्रियता मिळेल. आर्थिक लाभ होतील. स्वादिष्ट भोजन मिळेल. विद्यार्जनासाठी विद्यार्थ्यांनाआजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा 

तूळ: आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. आपली कलात्मक व रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज विदेशात राहणारे स्नेही व नातलगांकडून आनंददायी बातम्या मिळतील. लाभ होईल. आनंद प्राप्तीसाठी पैसा खर्च होईल. दांपत्य जीवनात जोडीदाराच्या प्रेमळ सहवासात वेळ घालवाल. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख - शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. प्रेमाच्या सुखद क्षणांचा आनंद घ्याल. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. आणखी वाचा 

मकर: आज व्यापार - व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. आणखी वाचा 

कुंभ: शारीरिक दृष्टया थकवा, बेचैनी व उबग जाणवेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. शरीरात स्फूर्ती जाणवणार नाही व त्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा 

मीन: आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारावर खर्च होईल. अचानक खर्च वाढतील. अचानक धनलाभाने आपला त्रास दूर होईल. मनाला शांती लाभण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आणखी वाचा 

Web Title: Daily horoscope 28 March 2024 Astrology love life prediction career guidance dos donts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app