राशीभविष्य, २ एप्रिल २०२५: आजचा दिवस फलदायी, पण 'या' राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 07:40 IST2025-04-02T07:40:03+5:302025-04-02T07:40:43+5:30

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Daily horoscope 2 April 2025 Astrology love life promotion career guidance zodiac sign | राशीभविष्य, २ एप्रिल २०२५: आजचा दिवस फलदायी, पण 'या' राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा!

राशीभविष्य, २ एप्रिल २०२५: आजचा दिवस फलदायी, पण 'या' राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा!

मेष - आजचा दिवस खर्चाचा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक देवाण- घेवाण करताना सावध राहावे लागेल. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आणखी वाचा...

वृषभ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक व कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. आणखी वाचा...

मिथुन - कुटुंबीय व सगे - सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. आणखी वाचा...

कर्क -  आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. आणखी वाचा...

सिंह - आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. आणखी वाचा...

कन्या - आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. आणखी वाचा...

तूळ - एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. आणखी वाचा...

वृश्चिक - आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा...

धनु - आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. नोकरी - व्यवसायात उन्नती व मान - सन्मान प्राप्त होईल. आणखी वाचा...

मकर- आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्‍यात अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा...

कुंभ- आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. आणखी वाचा...

मीन- पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल. प्रणयाराधन वाढेल. आणखी वाचा...

Web Title: Daily horoscope 2 April 2025 Astrology love life promotion career guidance zodiac sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app