राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 07:44 IST2025-06-10T07:41:53+5:302025-06-10T07:44:32+5:30
Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
मेष: आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. ह्या विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. आणखी वाचा...
वृषभ: आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. व्यापार्यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात यश व कीर्ती प्राप्त होईल. आणखी वाचा....
मिथुन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश - कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. आणखी वाचा...
कर्क: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. पोटदुखीचा विकार बळावेल. मानसिक चिंता व उद्वेग राहील. अचानक खर्च वाढतील. वाद संभवतात. आणखी वाचा...
सिंह: आज कुटुंबातील वातावरण वाद - विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल. आणखी वाचा...
कन्या: आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्या कडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा...
तूळ: आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. आणखी वाचा...
वृश्चिक: आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा...
धनु: उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल. आणखी वाचा...
मकर: आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर - सट्टा ह्यात धन लाभ होईल. आणखी वाचा...
कुंभ: आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आणखी वाचा...
मीन: आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. आणखी वाचा...