Aquarius Characteristics: एक आळस सोडला, तर कुंभेचा घडा ज्ञानाने, अनुभवाने आणि संवेदनशीलतेने भरलेला असतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:58 IST2022-06-02T16:57:27+5:302022-06-02T16:58:02+5:30
Aquarius Characteristics: ही रास अतिशय भाग्यवान असूनही या लोकांची कामावर जास्त श्रद्धा असते.

Aquarius Characteristics: एक आळस सोडला, तर कुंभेचा घडा ज्ञानाने, अनुभवाने आणि संवेदनशीलतेने भरलेला असतो!
कुंभ अर्थात घडा. घडा म्हटल्यावर तो भरलेला असू शकतो नाहीतर रिकामा किंवा पालथासुद्धा! मात्र ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने हा घडा अर्थात कुंभ राशीचा ज्ञानाचा घडा भरलेला असतो. अर्थात या राशीचे लोक अतिशय बुद्धिमान, संवेदनशील असतात.
स्मरणशक्ती ही त्यांची जमेची बाजू असते. जुन्यात जुनी गोष्ट त्यांना स्पष्टपणे आठवते. त्यामुळे या लोकांशी वाद घालताना जपूनच शब्द टाकलेला बरा. ते कधी कोणते पुरावे देऊन आपल्याला आश्चर्यचकित करतील हे सांगता येणार नाही. या लोकांना खुबीने आपले काम दुसऱ्यांकडून काढून घेता येते. मात्र त्यांचे वैशिष्ट्य असे की ते कोणालाही न दुखवता आपला स्वार्थ साध्य करतात. हे तंत्र त्यांना अवगत असते.
कोणाला दुखावणे, वाईट बोलणे, या गोष्टी त्यांच्या स्वभावात नसतात. हे लोक एवढे संवेदनशील असतात की त्यांना शत्रूचाही कळवळा येतो. त्यांच्याप्रतीदेखील कणव वाटते. त्यांच्याकडून वाईट वागणुकीची शक्यता फार कमी असते.
या लोकांचा राग हा मुख्य शत्रू असतो. हे लोक रागाच्या भरात मनातल्या मनात कुढत राहतात. यांना कधी कोणाचा राग येईल सांगता येत नाही. राग व्यक्त करून मोकळे न होता ते स्वतःलाच त्याचा त्रास करून घेतात. अशात त्यांचेच जास्त नुकसान होते. त्यांनी रागावर नियंत्रण मिळवायला शिकले पाहिजे. त्यासाठी ध्यानधारणेचा सराव करावा. यश मिळवण्यासाठी त्यांना आवड असते आणि मेहनतीची तयारीही असते. फक्त रागावर नियंत्रण मिळवले तर ते अपेक्षित यश संपादित करू शकतील.
असे म्हणतात की बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्यांचे सोनेही विकले जात नाही. म्हणून कुंभ राशीच्या जातकांनी आपले ज्ञान बोलून व्यक्त केले पाहिजे. ज्ञानाचे प्रदर्शन नको, परंतु आवश्यक तिथे न बोलल्यामुळे तुमची बाजू कमकुवत आहे असा जगाचा समज होतो. त्यामुळे आवश्यक तिथे मुद्देसूदपणे आपले विषय मांडायला शिका.
कुंभ म्हणजे लोक भाग्यवान असतात. जर कुंडलीत ग्रह योग्य स्थितीत असतील तर खूप श्रीमंत होऊ शकतात. असे असूनही या लोकांचा नशिबावर कमी आणि स्वकष्टावर जास्त विश्वास असतो. त्यामुळे या लोकांना भाग्याचा साथीमुळे म्हणा नाहीतर अथक मेहनतीमुळे म्हणा, प्रगती होण्यावाचून कोणीही रोखू शकत नाही.
या लोकांचा आळस हा देखील दुसरा शत्रू असतो. आळसामुळे त्यांचे शरीर स्वास्थ्याकडेही दुर्लक्ष होते. स्थूलत्व येते आणि त्यांचे शरीर अनेक आजारांचे माहेर घर होते. म्हणून या लोकांनी मैदानी खेळ, व्यायाम, योगाभ्यास यांची आवड लावून घेतली, तर बुद्धी तल्लख होईलच शिवाय शरीरही चपळ होईल आणि निरोगी राहील.