निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य जपावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:45+5:30

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण नियोजन भवनात झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, नोडल अधिकारी (कायदे व सुव्यवस्था व मनुष्यबळ व्यवस्थापन) नितीन व्यवहारे, जिल्हा सूचना अधिकारी अरूण रणवीर आदी यावेळी उपस्थित होते. या प्रशिक्षणात १८० निरीक्षकांनी भाग घेतला.

The sanction of the electoral process should be maintained | निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य जपावे

निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य जपावे

Next
ठळक मुद्देमहावीरप्रसाद वर्मा : सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकशाहीला अभिप्रेत असलेले निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य व ‘प्युरिटी’ जपण्याचे काम सूक्ष्म निरीक्षकांनी करावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक सामान्य निरीक्षक महावीरप्रसाद वर्मा यांनी सोमवारी दिले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण नियोजन भवनात झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, नोडल अधिकारी (कायदे व सुव्यवस्था व मनुष्यबळ व्यवस्थापन) नितीन व्यवहारे, जिल्हा सूचना अधिकारी अरूण रणवीर आदी यावेळी उपस्थित होते. या प्रशिक्षणात १८० निरीक्षकांनी भाग घेतला.
आपण निवडणूक कालावधीत मूळ आस्थापनेवर कार्यरत नसून, निवडणूक आयोगाच्या डेप्युटेशनवर आहात याची जाणीव ठेवा. मतदारसंघांचे मुख्य निरीक्षक सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत म्हणून त्यांना सहाय्यासाठी निरीक्षणाची महत्वाची जबाबदारी आपल्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून गांभीर्याने काम करा, सामान्य निरीक्षक वर्मा म्हणाले. निवडणूक ही केवळ कागदावरची एक्झरसाईज नाही, याचे भान ठेवावे. प्रत्यक्ष प्रक्रियेची इत्थंभूत माहिती ठेवावी. कोणतीही तक्रार आली तर लगेच दखल घ्यावी. आपल्या कामाबद्दल वा तरतुदींबद्दल कुठलाही संभ्रम असेल तर प्रशिक्षणातच त्याचे निराकरण करून घ्यावे. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक बाब नियमानुसार पार पडते किंवा कसे, याच्या निरीक्षणाची महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आहे. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रणा, मशिन वाटप, मॉकपोल, पथके या बाबींबद्दल काटेकोर माहिती ठेवावी. या काळात आपले पूर्ण लक्ष जबाबदारीवर केंद्रित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
आठही मतदारसंघांसाठी सामान्य निरीक्षक, निवडणूक खर्च निरीक्षक व कायदा व सुव्यवस्थेचे निरीक्षक आयोगाद्वारा निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी सामान्य निरीक्षक व निवडणूक खर्च निरीक्षक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. त्यांच्याद्वारा अधिकारी, कर्मचारी व पथकांचा आढावा घेतला जात आहे.

सूक्ष्म निरीक्षकांनी पडताळावयाच्या बाबी
मॉक पोल प्रक्रिया, पोलिंग एजंट उपस्थिती, मतदान केंद्र प्रवेश प्रक्रिया, मतदार ओळखपत्रानुसार (११ पयार्यांसह) प्रवेश प्रक्रिया, मतदान प्रक्रियेची गुप्तता कायम राखणे आदी बाबी पडताळावयाच्या असून काहीही अनुचित बाब आढळल्यास सामान्य निरीक्षकांना तत्काळ कळवावी, असे निर्देश नोडल अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी यावेळी दिले. बुधवारी सूक्ष्म निरीक्षकांचे रँडमायझेशन करण्यात येत आहे. याअनुषंगाने व्यवहारे व रणवीर यांनी माहिती दिली.

Web Title: The sanction of the electoral process should be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.