अमरावतीत महापौर भाजपचा ? आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची होणार मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 07:48 IST2026-01-19T07:47:31+5:302026-01-19T07:48:01+5:30

शहरात वेगवान घडामोडी सुरू

Amravati the mayor will be from the BJP with the support of MLA Ravi Rana Yuva Swabhiman Party | अमरावतीत महापौर भाजपचा ? आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची होणार मदत

अमरावतीत महापौर भाजपचा ? आ. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची होणार मदत

अमरावती : अमरावती महापालिकेत कोणत्याही पक्षाला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या मदतीने अमरावतीत महापौर भाजपचाच होईल, अशा वेगवान घडामोडींना वेग आला आहे.

भाजप २५, युवा स्वाभिमान १५, राष्ट्रवादी (अजित पवार) ११, काँग्रेस १५, एमआयएम १२, शिंदेसेना ३, उद्धवसेना २, बसप ३ आणि वंचित बहुजन आघाडी १ असे एकूण ८७ सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापनेसाठी ४४ सदस्य आवश्यक असून युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा यांनी भाजपचा महापौर विराजमान होण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

त्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) ला बाजूला ठेवण्याची रणनीती राणांनी आखली आहे. भाजप, युवा स्वाभिमान, शिंदेसेना, बसप आणि उद्धवसेना अशी मोट बांधत भाजपचा महापौर बनविण्यासाठी आमदार रवी राणांची ही नवी राजकीय खेळी असेल. तर काँग्रेस, एमआयएम, राष्ट्रवादी (अजित पवार) हे विरोधी बाकावर असतील, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे महापौर निवडीकडे लक्ष लागले आहे.

कोल्हापूरमध्ये भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेंच

कोल्हापूर : कोल्हापुरात महायुतीचे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर भाजपचा की शिंदेसेनेचा होणार याविषयीची उत्सुकता ताणली आहे. युतीत सर्वाधिक जागा जिंकून भाजप पुढे असल्याने त्या पक्षाचा महापौर पदावर नैसर्गिक हक्क आहे. परंतु, महापौर शिंदेसेनेचाच अशी हाक देऊन निवडणुकीच्या मैदानात शिंदेसेना उतरली होती. त्यामुळे हा पक्ष काय भूमिका घेतो यावर सर्व गणिते अवलंबून असतील.

महापालिकेच्या ८१ सदस्यांच्या सभागृहात भाजपला २६, शिंदेसेनेला १५ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ला ४ जागा मिळाल्या आहेत. बहुमतासाठी ४१ सदस्य लागतात. महायुतीकडे ४५ सदस्यांचे बळ आहे. विरोधात काँग्रेसकडे ३४ आणि उद्धवसेनेचा एक असे ३५, तर जनसुराज्य हा भाजपचा मित्रपक्ष असल्याने त्यांचा एक नगरसेवकही महायुती सोबतच राहील. भाजप-शिंदेसेनेत जागा वाटपावेळीच प्रचंड ताणाताणी झाली होती. एकेक जागेसाठी दोन्हीकडून ताकद पणाला लावली गेली, होती.

शिंदेसेनेतून आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा निवडून आला आहे. मुलाला महापौर करण्याचे प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे शिंदेसेना किती ताणते यावर महापौरपद कुणाला मिळणार हे ठरू शकते. विरोधी आघाडीला बहुमतासाठी ६ मते कमी पडतात. शिंदेसेनेने काही वेगळी भूमिका घेतल्याशिवाय त्यांना सत्तेपर्यंत पोहोचता येत नाही. सध्या तशी कोणतीही शक्यता वाटत नाही. त्यामुळे येथील घडामोळी लक्षवेधी ठरल्या आहेत.
================

Web Title : अमरावती में भाजपा का महापौर? रवि राणा की पार्टी कर सकती है मदद।

Web Summary : अमरावती में, रवि राणा की युवा स्वाभिमान पार्टी के समर्थन से भाजपा महापौर पद सुरक्षित कर सकती है। गठबंधन बन रहे हैं, जिससे संभावित रूप से एनसीपी (अजित पवार) अलग हो सकते हैं। वहीं, कोल्हापुर में महापौर पद के लिए भाजपा और शिंदे सेना के बीच तनाव है।

Web Title : Amravati Mayor to be BJP's? Ravi Rana's party may help.

Web Summary : In Amravati, BJP may secure the mayor's position with support from Ravi Rana's Yuva Swabhiman party. Coalitions are forming, potentially sidelining NCP (Ajit Pawar). Meanwhile, Kolhapur sees tension between BJP and Shinde Sena over mayoral candidacy due to power struggles.