भक्ताची इच्छापूर्ती... हैदराबादच्या भक्ताने शिर्डीच्या साईचरणी अर्पण केलं 4 किलो सोनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:16 IST2022-05-18T17:04:10+5:302022-05-18T17:16:08+5:30
हैद्राबाद येथील पार्थ सारथी रेड्डी यांना 2016 मध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याची पट्टी दान करायची होती

भक्ताची इच्छापूर्ती... हैदराबादच्या भक्ताने शिर्डीच्या साईचरणी अर्पण केलं 4 किलो सोनं
अहमदनगर - महराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शिर्डीसाईबाबा मंदिरास जगभरातून भाविक भक्त भेट देतात. साई मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर अनेकजण आपली मनोकामना बोलून दाखवतात. तर, काहीजण मनोकामना पूर्ती झाल्याचे सांगत साईचरणी महागड्या वस्तूंचं अर्पण करतात. गुप्तदान पेटीतही अनेकदा कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू मंदिर समितीला प्राप्त झाल्या आहेत. आता, हैदराबाद येथील एका साईभक्ताने तब्बल 4 किलो सोनं साईचरणी अर्पण केलं आहे.
हैद्राबाद येथील पार्थ सारथी रेड्डी यांना 2016 मध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याची पट्टी दान करायची होती. परंतु, त्यावेळी आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने सोनं अर्पण करायचं राहून गेलं होतं. त्यानंतर, कोविड महामारीमुळे ही दानप्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे, साईभक्त पार्थ रेड्डी यांनी मंदिर समितीच्या सूचनेनुसार आत्ता हे 4 सोन्याची पट्टी दान केली आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्टच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी दिली. साईबाबांच्या मूर्तीच्या चौथऱ्याभोवती ही पट्टी बसविण्यात आली आहे. सध्याच्या बाजार भावानुसार या सोन्याच्या पट्टीची किंमत 2 कोटी रुपये एवढी आहे.
Maharashtra | Parthasarth Reddy, a philanthropist from Hyderabad, donated 4 kg of gold worth about Rs 2 crores at Sai Baba Temple in Shirdi, Ahmednagar district pic.twitter.com/azrnINH46h
— ANI (@ANI) May 18, 2022
दरम्यान, शिर्डी मंदिरात 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान यावर्षी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान 4 कोटी 57 लाखांचे दान संस्थानला प्राप्त झाले असून या तीन दिवसात पावणे तीन लाख साईभक्तांनी साई दर्शन घेतले आहे.