तरूणींच्या घामापासून इथे बनवली जाते अजब डिश, मोठ्या चवीने खातात लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 10:45 AM2024-05-04T10:45:20+5:302024-05-04T10:47:29+5:30

लोकांना एक अजब डिश खाण्याची सवय लागली आहे. हे लोक तांदळापासून बनवलेली एक डिश खात आहेत.

Japanese girl making armpit rice dish armpit onigiri | तरूणींच्या घामापासून इथे बनवली जाते अजब डिश, मोठ्या चवीने खातात लोक!

तरूणींच्या घामापासून इथे बनवली जाते अजब डिश, मोठ्या चवीने खातात लोक!

खाकेतील घाममुळे लोक हैराण होत असतात. कारण या घामामुळे दुर्गंधी येते. कपडेही खराब होतात. त्यामुळे लोक घाम येऊ नये म्हणून वेगवेगळे उपाय करतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका देशात या घामाचा वापर करून एक अजब डिश बनवली जाते. हा देश म्हणजे जपान. येथील लोकांना एक अजब डिश खाण्याची सवय लागली आहे. हे लोक तांदळापासून बनवलेली एक डिश खात आहेत. जी महिलांच्या काखेतील घामामध्ये बनवली जात आहे.

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ऑनिगिरी नावाची डिश जपानमध्ये फेमस आहे. यात भाताचा गोळा असतो. लाडूसारखा भाताचा गोळा. यात महिलांच्या काखेतील घाम मिक्स करण्याची परंपरा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे याला इथे Armpit onigiri म्हटलं जात आहे. आता ही डिश जपानमधील रेस्टॉरंटमध्ये खूप विकली जाते. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट वेबसाइटनुसार ही डिश जपानमधील फार जुनी डिश आहे.

काखेतील घामापासून डिश

आता डिशमध्ये अजब बदल केला गेला आहे. तरूणी ही डिश बनवण्यासाठी आपल्या काखेतील घामाचा वापर करतात. त्या काखेत भाताचे गोळे टाकतात आणि त्यांना शेप देतात. सोबत घामाने त्यांना सॉफ्ट बनवतात. नंतर लोकांना ते खाण्यासाठी देतात. डिश तयार करण्याआधी शरीराचा ह भाग स्वच्छ केला जातो. नंतर तरूणी एक्सरसाइज करतात, ज्यामुळे त्यांना घाम येतो. नंतर हातांचा वापर करण्याऐवजी त्या भाताचा गोळा बनवण्यासाठी काखेचा वापर करतात.

ही डिश अनेक रेस्टॉरंटमध्ये खूप जास्त किंमतीत विकली जात आहे. रिपोर्टनुसार, अनेक ठिकाणी तर ही डिश 10 पटीने जास्त किंमतीत विकली जात आहे. एका व्यक्तीने ही डिश खाल्ली आणि सांगितलं की, याची टेस्ट सामान्य भातापेक्षा खूप वेगळी आहे. अनेक रेस्टॉरंटमध्ये तर ग्राहकांना किचनमध्ये जाऊ देऊन डिश कशी बनवली जाते हे बघू दिलं. 2013 मध्ये एक शोध झाला होता ज्यात आढळलं की, शरीराच्या काही भागांमध्ये येणाऱ्या घामामध्ये फोरोमॉन असतात ज्यांचा वास घेतल्याने किंवा चाटल्याने मनुष्यांचे इमोशन चांगले बनवले जाऊ शकतात.

Web Title: Japanese girl making armpit rice dish armpit onigiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.