नवीन EV स्कूटर लॉन्च; कश्मीर ते कन्याकुमारी झालेली चाचणी, 136 km रेंज, पाहा किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:24 PM2024-05-02T16:24:02+5:302024-05-02T16:24:46+5:30

भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हिलर मार्केटमध्ये आणखी एका EV स्कूटरची एन्ट्री झाली आहे.

Ampere Nexus Electric Scooter By Greaves Electric Mobility Launched With 136 Km Range | नवीन EV स्कूटर लॉन्च; कश्मीर ते कन्याकुमारी झालेली चाचणी, 136 km रेंज, पाहा किंमत...

नवीन EV स्कूटर लॉन्च; कश्मीर ते कन्याकुमारी झालेली चाचणी, 136 km रेंज, पाहा किंमत...

Ampere Nexus Electric Scooter : भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हिलर मार्केटमध्ये आणखी एका स्कूटरची एन्ट्री झाली आहे. Greaves Electric Mobility Pvt Ltd ने आपली दमदार Ampere Nexus भारतीय बाजारपेठेत विक्रीसाठी लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची भारतीय रस्त्यांवर दीर्घकाळापासून चाचणी सुरू होती. विशेष म्हणजे, ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, ज्याने काश्मीर ते कन्याकुमारी, हा प्रवास केला आहे. 10 हजार किलोमीटर ऑन रोड चाचणीनंतर कंपनीने ही स्कूटर लॉन्च केली. या स्कूटरची किंमत 1,09,900 रुपये(एक्स-शोरुम) आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्णपणे मेड इन इंडिया आहे.

Ampere Nexus मध्ये काय खास आहे?
Ampere Nexus इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बेस्ट इन-क्लास हायब्रिड स्विंग आर्म आणि ट्विन सस्पेंशन, यूनिक एअर कूल आर्किटेक्चरसह बेस्ट-इन-क्लास एअरोडायनॅमिक्स, Nex.Armor ने सुसज्ज पॉवरफुल डिझाइन आणि मजबूत चेसिस, स्मार्टसेंस टेक्नॉलजीने सुसज्ज 7 इंच टीएफटी टचस्क्रीन, डायमंड कट हेडलँप, आर्कटिक टर्न इंस्पायर्ड टेललँप्स, लायटवेट अॅल्यूमिनियम ग्रॅब हँडलने सुसज्ज मोठी सीट मिळेल. कंपनीने गेल्या महिन्यात या स्कूटरची बुकिंग सुरू केली होती. आता 15 मे पासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होईल.

या रंगांमध्ये उपलब्ध
Ampere Nexus ला Janskar Aqua, Indian Red, Lunar White आणि Steel Grey, अशा 4 आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3 kWh LFP बॅटरी आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या बॅटरीची 30 टक्के अतिरिक्त लाइफ आहे. याची इलेक्ट्रिक मोटर 4 किलोवॅटची पीक पॉवर जनरेट करते. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही घरच्या वीजेने 3 तास 22 मिनिटांत फुल चार्ज करू शकता. Ampere Nexus ची बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यावर 136 किलोमीटरची रेंज मिळते. स्कूटरचा टॉप स्पीड 93 किमी प्रतितास आहे.

Web Title: Ampere Nexus Electric Scooter By Greaves Electric Mobility Launched With 136 Km Range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.