३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 01:27 PM2024-05-17T13:27:02+5:302024-05-17T13:33:37+5:30

१२ वर्षांनी शुभ राजयोग जुळून येत असून, कोणत्या राशींना अपार लाभ, सर्वोत्तम संधी प्राप्त होऊ शकतात, ते जाणून घ्या...

मे महिना वृषभ राशीतील ग्रहांच्या योगांनी विशेष आणि महत्त्वाचा ठरत आहे. गुरु, सूर्य, शुक्र आणि बुध हे चार ग्रह मे महिन्यात वृषभ राशीत असणार आहेत. गुरु, सूर्य हे ग्रह वृषभ राशीत विराजमान झाले असून, शुक्र आणि बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत.

१२ वर्षांनी वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग जुळून येणार आहे. तसेच बुधादित्य आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे. गुरु, बुध, सूर्य आणि शुक्र या ग्रहांच्या शुभ युती योगाने हे राजयोग जुळून येणार आहे.

गजलक्ष्मी बुधादित्य मालव्य राजयोग काही राशींना अतिशय लाभदायक, उत्तम संधींचा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. नोकरी, करिअर, व्यवसाय, आर्थिक आघाडीवर आगामी काळ चांगला ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. घरात शुभ कार्य होऊ शकते. पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. यशाची नवीन उंची गाठाल. करिअरमध्ये चांगले यश मिळू शकेल. नवीन संधी मिळतील. व्यवसायात धनवृद्धी होईल आणि काही नवीन केल्याने फायदा होऊ शकेल. बॉस कामावर खूप खूश असेल. कामात आत्मविश्वास मिळेल. उत्साह वाढेल.

वृषभ: व्यक्तिमत्व सुधारेल. महत्त्वाच्या लोकांशी संबंध वाढतील. भौतिक सुखसोयी मिळतील. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी मोठे पद मिळू शकते. वैवाहिक जीवन सुंदर असू शकेल.

कर्क: उत्पन्नात वाढ होऊ शकते. आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे. या कालावधीत केलेली गुंतवणूक दुप्पट नफा देणारी ठरू शकेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी काळ अनुकूल आहे.

कन्या: शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर काही चांगल्या ऑफर मिळू शकतात. नोकरी बदलण्यासाठी वेळ चांगली आहे. पगारही चांगला असेल. कोणताही निर्णय घ्याल तर आनंद वाटू शकेल. सर्वकाही चांगले होऊ शकेल.

वृश्चिक: फायदे होतील. व्यक्तिमत्व सुधारेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल तर यशस्वी व्हाल. प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आयुष्यात प्रगती करण्याची हीच वेळ आहे. करिअर आणि व्यवसायात अनेक उत्तम संधी मिळतील.

मकर: मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. लोकप्रियतेत वाढ दिसेल. वडिलांसोबत नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

मीन: उत्पन्नात वाढ होऊ शकेल. व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. आर्थिक समृद्धी वाढू शकेल. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.