ध्वनियंत्रणेच्या दणदणाटात कोल्हापूरात संयुक्त मंगळवार पेठेची शिवजयंती मिरवणुक

By संदीप आडनाईक | Published: May 9, 2024 09:59 PM2024-05-09T21:59:13+5:302024-05-09T21:59:28+5:30

तब्बल पाच तास मिरवणुक

Shiv Jayanti Procession of Joint Mangalwar Peth in Kolhapur | ध्वनियंत्रणेच्या दणदणाटात कोल्हापूरात संयुक्त मंगळवार पेठेची शिवजयंती मिरवणुक

ध्वनियंत्रणेच्या दणदणाटात कोल्हापूरात संयुक्त मंगळवार पेठेची शिवजयंती मिरवणुक

कोल्हापूर: ध्वनि यंत्रणेच्या दणदणाटात गुरुवारी संयुक्त मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळाची शिवजयंती उत्सवाची मिरवणूक पार पडली. मिरजकर तिकटीहून निघालेल्या या मिरवणुकीत आवाज वाढल्यामुळे कांही काळ पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली तर ट्रॅक्टर पुढे काढण्यावरुन पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तब्बल पाच तास ही मिरवणुक सुरु होती.

मिरजकर तिकटी चौकातून निघालेली ही मिरवणुक बिनखांबी गणेश मंदिर, न्यू महाद्वार, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी चौक, बिंदू चौक, देवल क्लबमार्गे मिरजकर तिकटी या मार्गे निघाली. सायंकाळी श्री मालोजीराजे छत्रपती, राज्य कार्यकारी नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उध्दवसेनेचे नेते विजय देवणे, बाबुराव चव्हाण, बाबासाहेब लबेकरी आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या मिरवणुकीला सुरुवात झाली. 

शेकडो युवक लेझीम आणि हलगीच्या ठेक्यात बेधुंद होऊन नाचत होते. युवकांनी शिवचरित्रावरील आधुनिक शौर्यगीतावर भगवा ध्वज हाती घेऊन ठेका धरला होता. १३ संस्थानकालीन तालीम संस्था शंभरहून अधिक तरुण मंडळांचा या मिरवणुकीत सहभाग होता. पोलिसांनी अनेकवेळा आक्षेप घेउनहीपोलिसांनी अनेकवेळा आक्षेप घेउनही या मिरवणुकीत सहभागी झालेली सर्वच मंडळांचे कार्यकर्ते आकर्षक विद्युत रोषणाईसह ध्वनियंत्रणेचा दणदणाटात नृत्य करत होते. मिरवणुकीचे आयोजन उत्सव समितीचे आर्यनिल जाधव, अनिकेत घोटणे, श्रीधर पाटील, यश कदम, विनायक पाटोळे, अक्षय देवकर, सागर गवळी, ओमकार घोटणे, गजानन यादव, निवास शिंदे,अशोक पवार, रमेश मोरे, संदीप चौगुले, सदानंद सुर्वे, जयसिंग शिंदे, बाबा पार्टे यांनी केले.

विडंबनात्मक चित्रफलक
मिरवणुकीत सहभागी झालेले विडंबनात्मक, विनोदी आणि टीकात्मक चित्ररथ लक्ष वेधून घेत होता. राज्य सरकार, महापालिका आणि नागरिकांच्या नागरिकांच्या समस्यांवरील हे चित्रफलक होते. महापालिकेत खमक्या आयुक्त द्या, लग्नासाठी मुलींच्या वास्तव अपेक्षा, स्वच्छतेत शहर एक नंबर मोठा जोक, हायकोर्टासाठी कोल्हापूरकरांची फसवणूक, कोल्हापूरची ग्रामपंचायत करा, गडकोट किल्ल्यांचा चाललेला दुरुपयोग, अंबाबाई म्हणते शहराच्या बकाळ अवस्थेमुळे मलाच लाज वाटते, वाढती अतिक्रमणे, बेजबाबदार अधिकारी आणि नागरिक, अपूर्ण क्रीडा संकुल भ्रष्टाचाराचे कुरण अशा आशयाचे हे फलक होते.

Web Title: Shiv Jayanti Procession of Joint Mangalwar Peth in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.