अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 02:50 PM2024-05-20T14:50:10+5:302024-05-20T14:50:44+5:30

इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला.

iran-president-ebrahim-raisi-death-death-conspiracy-theories-is-israel-behind-this | अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...

अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...

Iran President Ebrahim Raisi Death : इराणचेराष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी (Ebrahim Raisi) यांचे रविवारी(दि.19) हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियान आणि इतर 9 जण होते. सोमवारी इराणच्या माध्यमांनी राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्र्यांसह सर्वांच्या मृत्यूची पुष्टी केली. इराणच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, राष्ट्राध्यक्ष रईसी यांचे हेलिकॉप्टर पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले.

रात्रीचा अंधार आणि खराब हवामानामुळे बचाव कर्मचाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचण्यासाठी खुप उशीर झाला. पाऊस आणि धुक्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण, सोशल मीडियावर काही लोक या घटनेला इस्रायलचे 'षडयंत्र' म्हणत आहेत. याचे कारण म्हणजे, हमास आणि इस्रायल युद्धात, इराण हमासला उघडपणे पाठिंबा देत आहे. तसेच, काही दिवसांपूर्वीच इराण आणि इस्रायल, या दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले केले. त्या घटनेचा काही दिवसानंतरच इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संशय व्यक्त केला जात आहे.

दोन हेलिकॉप्टर सुखरूप परतले, रईसींचे हेलिकॉप्टर कोसळले
सोशल मीडियावर इराणचे काही लोक म्हणत आहेत की, रईसींच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते, मग दोन हेलिकॉप्टर सुखरुप पोहोचले अन् नेमके त्यांचेच हेलिकॉप्टर कसेकाय कोसळले? दरम्यान, या घटनेबाबत इस्रायलनेही आपली बाजू मांडली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सशी बोलताना इस्रायलच्या एका वरिष्ठ इराणीयन अधिकाऱ्याने स्पष्टपणे सांगितले की, या अपघातात आमची कोणतीही भूमिका नाही.

तज्ञ काय म्हणतात?
इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूमागे इस्रायलचा हात असल्याचा दाव्याचे तज्ञ खंडन करतात. इराणच्या राष्ट्राध्यक्षांना ठार मारणे म्हणजे थेट युद्धाची घोषणा करणे, असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, इस्रायलने नेहमीच इराणच्या लष्करावर हल्ले केले आहेत, हाय-प्रोफाइल राजकीय व्यक्तींना नाही. दुसरीकडे, अमेरिकन सिनेटर चार शुमर यांनी रईसी यांच्या मृत्यूमागे कोणताही कट नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, सध्या अमेरिकन गुप्तचर संस्थांना असा कोणताही पुरावा सापडलेला नाही ज्याच्या आधारे याला कट म्हणता येईल.

Web Title: iran-president-ebrahim-raisi-death-death-conspiracy-theories-is-israel-behind-this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.