लिव्हरमधील विषारी पदार्थ लगेच बाहेर काढेल हे खास ज्यूस, होणार नाही काही समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 01:48 PM2024-05-10T13:48:45+5:302024-05-10T13:49:15+5:30

नियमितपणे लिव्हर स्वच्छ केलं नाही तर ते खराबही होऊ शकतं. तसेच शरीरात वेगवेगळ्या समस्याही होतात. 

Nutritionist told how to use amla to detox your liver naturally | लिव्हरमधील विषारी पदार्थ लगेच बाहेर काढेल हे खास ज्यूस, होणार नाही काही समस्या

लिव्हरमधील विषारी पदार्थ लगेच बाहेर काढेल हे खास ज्यूस, होणार नाही काही समस्या

शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणजे लिव्हर आहे. लिव्हरद्वारे शरीरातील अनेक महत्वाची कामे केली जातात. लिव्हर रक्तातील विषारी पदार्थ फिल्टर करतं. तसेच लिव्हर व्हिटॅमिन्स, मिनरल आणि ग्लूकोज स्टोर करून शरीराला ऊर्जाही देतं. त्याशिवाय लिव्हर प्रोटीन बनवण्याचं महत्वाचं कामही करतं. पित्त सुद्धा तयार करतं. अशात नियमितपणे लिव्हर स्वच्छ केलं नाही तर ते खराबही होऊ शकतं. तसेच शरीरात वेगवेगळ्या समस्याही होतात. 

लिव्हरची स्वच्छता म्हणजे लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी काही नॅचरल उपायही करू शकता. काही आयुर्वेदिक जडीबुटींच्या माध्यमातूनही तुम्हील लिव्हर डिटॉक्स करू शकता. न्यूट्रिशनिस्ट Munmun Ganeriwa ने याबाबत एक उपाय सांगितला आहे.

आवळ्याने करा लिव्हर डिटॉक्स

रोज सकाळी रिकाम्या पोटी 100 मिली आवळ्याचा रस सेवन करा. तसेच आवळ्याचं पावडर कोमट पाण्यात टाकूनही सेवन करू शकता. तसेच तुम्ही तसाच आवळाही खाऊ शकता. आवळ्याच्या या उपायांमधील कोणतीही एक उपाय तुम्ही 15 ते 30 दिवस करा. 

काय काळजी घ्याल

जर तुम्हाला पोटाच्या वर उजव्या बाजूला वेदना, पिवळी लघवी, शरीर पिवळं पडणे अशी लक्षणं दिसत असतील तर आवळ्यासोबत कुटकी मिक्स करा. कुटकी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती तथा भरड धान्य आहे. 2.5 ग्रॅम आवळा पावडर आणि कुटकी कोमट पाण्यात मिक्स करा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी सेवन करा. हा उपाय 15 ते 30 दिवस करा. 

लिव्हर निरोगी ठेवण्याचे उपाय

तशी तर लिव्हरची स्वच्छता करण्याची खास अशी गरज नसते. पण लिव्हरची काळजीच घेऊ नये असं नाही. लिव्हर हेल्दी ठेवण्यासाठी खालील उपाय करता येतील.

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहारात फळं, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि हेल्दी फॅटचा समावेश करा. तसेच मद्यसेवन बंद करावं. लठ्ठपणामुळे लिव्हरवर दबाव पडतो. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवा. नियमितपणे व्यायाम करा. तणावामुळेही लिव्हरचं नुकसान होतं. अशात तणाव दूर करा.
 

Web Title: Nutritionist told how to use amla to detox your liver naturally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.