सुभाष फळदेसाई-बाबू कवळेकर यांच्यात 'वॉर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2024 10:16 AM2024-05-10T10:16:28+5:302024-05-10T10:17:38+5:30

सांगेत पक्षविरोधी कारवाईच्या आरोपावरून पेटले राजकारण; बाबू व सावित्री कवळेकर यांच्याकडून प्रत्युत्तर

clashes between bjp subhash phal desai and babu kavlekar after goa lok sabha election 2024 | सुभाष फळदेसाई-बाबू कवळेकर यांच्यात 'वॉर'

सुभाष फळदेसाई-बाबू कवळेकर यांच्यात 'वॉर'

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सांगेत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपांवरून मंत्री सुभाष फळदेसाई व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच त्यांच्या पत्नी सावित्री यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.

बाबू कवळेकर यांचे कर्मचारी तथा त्यांची पत्नी सावित्री यांचे कार्यकर्ते सांगे मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी वावरले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे बजावूनही भाजपविरोधात त्यांनी काम केले, असा खळबळजनक आरोप समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला आणि नव्या वादाला तोंड फुटले.

माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी या आरोपांना तात्काळ प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, पक्षाप्रति माझी निष्ठा आणि वचनबद्धता पक्ष नेतृत्वाला तसेच तमाम गोवकरांना ठाऊक आहे. फळदेसाई यांना माझी निष्ठा किंवा पत यावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार नाही. हताश व बोगस व्यक्तीकडून मला दाखल्याची गरज नाही, केपे मतदारसंघात काँग्रेसचा आमदार आहे, असे असूनही भाजपला तेथे मताधिक्य मिळेल, असा
विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सावित्री म्हणाल्या की, फळदेसाई यांची मयुरी सर्वांनाच ठाऊक आहे. अशी बेजबाबदार विधाने करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयल त्यांनी चालवला आहे. फळदेसाई हे स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांची नावे नाहक गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसऱ्याने केलेल्या कामाची दखल घेऊ श्रेय देण्यासाठी माणसाकडे मोठे मन असावे लागते. फळदेसाई यांनी याची जाणीव ठेवावी.

दरम्यान, फेब्रुवारी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत सावित्री कवळेकर यांना भाजपने तिकीट नाकारली. त्यानंतर त्यांनी सांगेतून फळदेसाईविरुद्ध अपक्ष म्हणून उमेदवारी भरली. त्यात सावित्री यांचा पराभव झाला. परंतु तेव्हापासून फळदेसाई व कवळेकर पती-पत्नी यांच्यात वैर कायम आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा उफाळून आले आहे.

माझे नाव गोवण्याचा प्रयत्न : सावित्री कवळेकर

फळदेसाई हे नाहक माझे नाव घेऊन अपप्रचार करीत आहेत, असे सावित्री कवळेकर यांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत मी दिलेल्या योगदानाची पक्षाला कल्पना आहे. दक्षिण गोव्याची जागा भाजप उमेदवाराने जिंकावी. यासाठी मीही परिश्रम घेतलेले आहेत, त्यामुळे फळदेसाई यांनी केलेल्या निरर्थक आरोपांना मी स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. निकालात काय ते स्पष्ट दिसून येईलच.

नव्या वादाला फुटले तोंड...

बाबू कवळेकर यांचे कर्मचारी तसेच त्यांची पत्नी सावित्री यांचे निकटचे कार्यकर्ते सांगे मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी वावरले, असा खळबळजनक आरोप मंत्री सुभाष फळदेसाई यांनी केला, त्यावर माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर व त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. हताश व बोगस व्यक्तीकडून आम्हाला निष्ठेच्या दाखल्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. फेब्रुवारी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत सावित्री कवळेकर फळदेसाईविरुद्ध सांगेतून अपक्ष लढल्या होत्या. तेव्हापासून तेव्हापासून फळदेसाई व कवळेकर पती-पत्नी यांच्यात पैर कायम आहे. आता लोकसभा निवद्वणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा उफाळून आले आहे.

दोन्ही जागा जिंकणार एवढेच ठाऊक : तानावडे

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानाचडे यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणी विरोधात काम केले हे मला माहीत नाही. मला एवढेच ठाऊक आहे की, भाजप या निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा हे दोन्ही मतदारसंघ जिंकणार आहे.

'जायंट किलर'

अन्य एका प्रश्नावर केपेचे आमदार एल्दन डिकॉस्टा है स्वयंघोषित 'जायंट किलर आहेत, अशी टीका कवळेकर यांनी केली. एल्टन यांनी भाजप सरकारचा विकासासाठी वापर करून घेतला व नंतर भाजपवर टीका सुरू केली. मुख्यमंत्री व पंतप्रधानांवरही त्यांनी टीका सुरू केली, असे कवळेकर म्हणाले.

२०२७ मध्ये माझी ताकद कळेल : मेशू

फळदेसाई यांनी कवळेकरांचे कर्मचारी म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला होता ते सांगे पालिकेचे नगरसेवक मेसिया ऊर्फ मेशु डिकॉस्टा यांनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. मेश म्हणाले की, मी कवळेकर यांचा कार्यालयीन कर्मचारी असल्याचे फळदेसाई यांनी सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईन तर आरोप सिद्ध न केल्यास फळदेसाई यांनी घरी बसावे. मी विरोधात काम केले असते तर फळदेसाईची सांगेत उभे राहण्याचीही ताकद राहिली नसती. २०२२ मध्ये माझी ताकद त्यांना दाखवली आहे. मी गप्प आहे यासाठी त्यांनी खरे तर देवाचे आभार मानावेत. आता २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत लोक फळदेसाई यांना त्यांच्या मग्रुरीचा धडा शिकवणार आहेत. खरोखरच भिडायचे असेल तर फळदेसाई यांनी २०२७ निवडणुकीत समोर यावे.
 

Web Title: clashes between bjp subhash phal desai and babu kavlekar after goa lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.