कोरोनाची संभाव्य तिसरी लाट; मूर्तिकारांपुढे वाढविते अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 05:00 AM2021-07-22T05:00:00+5:302021-07-22T05:00:02+5:30

ऑगस्टच्या सुमारास कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. याच सुमारास गणेशोत्सव येत आहे. यामुळे तिसरी लाट आल्यास बाजारपेठा पुन्हा बंद पडतील, अशा वेळी तयार झालेल्या गणेशमूर्ती विकायच्या कशा असा प्रश्न मूर्तिकारांपुढे निर्माण झाला आहे. यातूनच मूर्तिकारांनी राज्यभरात चाचपणी सुरू केली आहे.

A possible third wave of corona; Increases difficulties facing sculptors | कोरोनाची संभाव्य तिसरी लाट; मूर्तिकारांपुढे वाढविते अडचणी

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट; मूर्तिकारांपुढे वाढविते अडचणी

Next
ठळक मुद्देसार्वजनिक सण-उत्सवावरील निर्बंधाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गतवर्षी कोरोनाच्या लाटेत गणेश उत्सव आला होता. यामुळे तयार करण्यात आलेल्या मूर्तीची विक्रीच करता आली नाही. यातून जिल्ह्यातील मूर्तिकारांचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान भरून निघणार नाही तोच दुसराही गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात सापडला आहे. यामुळे मूर्तिकारांनी सावध पवित्रा घेत मूर्ती निर्मितीचे काम थांबविले आहे. यातून शेकडो मूर्तिकार आणि कारागीर बेरोजगार होण्याची शक्यता आहे. 
ऑगस्टच्या सुमारास कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आरोग्य यंत्रणेने व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. याच सुमारास गणेशोत्सव येत आहे. यामुळे तिसरी लाट आल्यास बाजारपेठा पुन्हा बंद पडतील, अशा वेळी तयार झालेल्या गणेशमूर्ती विकायच्या कशा असा प्रश्न मूर्तिकारांपुढे निर्माण झाला आहे. यातूनच मूर्तिकारांनी राज्यभरात चाचपणी सुरू केली आहे. सर्वच ठिकाणी मूर्तिकारांनी मोजक्याच मूर्ती घडविण्याचे काम हाती घेतले आहे. यातून वर्षभराचे नियोजन कोलमडले आहे. 
दरवर्षी जून-जुलै महिन्यात गणेश मूर्ती निर्मितीचे काम ८० ते ९० टक्के पूर्ण होते. यावर्षी गणेशमूर्ती निर्मितीचे काम करणारे कारखाने आणि त्या ठिकाणचे कारागीर यांची संख्या रोडावली आहे. या मूर्तिकारांना परिस्थिती काय येईल याची शाश्वती नाही. याशिवाय तयार झालेल्या मूर्ती विकल्या जातील की नाही, याची हमी नाही. याशिवाय गणेश मंडळ आणि घरगुती भक्तांकडून गणेशमूर्तीची ऑर्डर आलेली नाही. यातून मोठ्या गणेशमूर्ती आणि छोट्या गणेशमूर्ती दोन्हीचे काम रखडले आहे. 
बाजारात मूर्तीला रंग देण्यासाठी लागणारे रंग उपलब्ध नाही. सजविण्यासाठी लागणारे साहित्य नाही, तणस आणि इतर साहित्य मिळणे अवघड झाले आहे. या सर्व बाबींचा परिणाम मूर्ती निर्मितीवर झाला आहे. गतवर्षीच्या राहिलेल्या मूर्ती सजविल्या जात आहे. याशिवाय काही मोजक्याच मूर्ती घडविल्या जात आहे. शासनाचे धोरण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. संभाव्य काळात निर्बंधाबाबत संदिग्धता आहे. 

बैल आणि कृष्ण मूर्तीही नाही 
- मूर्तिकार आपल्या संपूर्ण परिवारात वर्षभरात लागणाऱ्या मूर्त्या तयार करतो. यामध्ये पोळा या सणाला विकले जाणारे मातीचे बैल आणि गोकुळाष्टमीला लागणाऱ्या कृष्णमूर्ती तयार केल्या जातात. यावर्षी यामूर्ती घडविण्याचे काम थंडबस्त्यात आहे. 

गणेश मूर्तीच्या संदर्भात काय धोरण असेल याबाबत अद्याप तरी स्पष्ट आदेश नाहीत. मात्र गतवर्षीनुसार चार फुटाची मूर्ती आणि इतर काही बाबी राहू शकतात. परंतु स्पष्ट सूचना आल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. 
- अमोल येडगे
जिल्हाधिकारी, यवतमाळ

 

Web Title: A possible third wave of corona; Increases difficulties facing sculptors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.