Ashram 3: 'बाबा निराला' येताहेत भेटीला, 'आश्रम ३'चा मोशन व्हिडीओ रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 06:11 PM2022-05-10T18:11:40+5:302022-05-10T18:12:07+5:30

Ashram 3 : 'आश्रम ३' वेब सिरीजचा मोशन व्हिडीओ रिलीज झाला आहे. हा मोशन व्हिडीओ रिलीज झाल्यानंतर या वेब सीरिजबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Ashram 3: 'Baba Nirala' coming to visit, Motion video release of 'Ashram 3' | Ashram 3: 'बाबा निराला' येताहेत भेटीला, 'आश्रम ३'चा मोशन व्हिडीओ रिलीज

Ashram 3: 'बाबा निराला' येताहेत भेटीला, 'आश्रम ३'चा मोशन व्हिडीओ रिलीज

Next

बॉबी देओल(Bobby Deol)च्या बहुप्रतीक्षित वेब सीरिज 'आश्रम ३'(Aashram 3)चा मोशन पोस्टर व्हिडीओ रिलीज झाला आहे. या व्हिडिओमध्ये सीझन ३चा लोगो स्पष्टपणे दिसत आहे. मागील पार्श्वभूमीत आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. हा मोशन व्हिडिओ रिलीज होताच या वेब सीरिजच्या तिसऱ्या भागाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. हा मोशन व्हिडीओ ईशा गुप्ता आणि बॉबी देओलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या मोशन व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. 

'आश्रम ३' वेब सिरीज कधी रिलीज होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र हा मोशन व्हिडीओ रिलीज होताच चाहत्यांना आश्रम वेब सीरिजचा तिसरा भाग लवकरच पाहायला मिळणार हे निश्चित आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान या वेब सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता संदीपने सांगितले होते की, शूटिंग आणि डबिंगचे काम पूर्ण झाले असून लवकरच नवीन सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.


या वेब सीरिजमध्ये बॉबी देओलने बाबा निरालाची अशी भूमिका साकारली की तो लोकांच्या मनात घर करून गेला. या वेब सिरीजची कथा काशीपूर या काल्पनिक शहरावर आधारित आहे. बाबा लोकांना आश्रमाशी जोडण्यासाठी कसे प्रवृत्त करतात हे वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे. या वेब सिरीजची कथा ड्रग्ज, बलात्कार आणि राजकारणाभोवती फिरते. प्रकाश झा यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.


'आश्रम' वेब सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये बाबांनी पम्मी आणि त्यांच्या कुटुंबाचा विश्वास जिंकल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. दुसऱ्या सीझनमध्ये बाबाची कारस्थाने पम्मी आणि तिच्या कुटुंबियांसमोर आली. मात्र बाबांवर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.अशा परिस्थितीत आश्रम वेब सिरीजचा तिसरा भागात काय पाहायला मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ता(Esha Gupta)ही 'आश्रम' वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे. अशा परिस्थितीत या वेबसीरिजबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

Web Title: Ashram 3: 'Baba Nirala' coming to visit, Motion video release of 'Ashram 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app