Lok Sabha Election 2019; स्थिर सरकारसाठी भाजपच आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:07 IST2019-04-08T21:05:36+5:302019-04-08T21:07:23+5:30
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले.

Lok Sabha Election 2019; स्थिर सरकारसाठी भाजपच आवश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. वर्धा येथे आयोजित व्यापाऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधिर मुनगंटीवार, विधान परिषदेचे माजी आमदार सागर मेघे, खासदार व भाजप उमेदवार डॉ. पंकज भोयर, लोकसभा प्रमुख सुधीर दिवे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अरूण काशीकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सागर मेघे म्हणाले की, रामदास तडस यांच्याशी मेघे कुटूंबाचे सदैव कौटूंबीक संबंध राहिलेत व ते पुढेही कायम राहतील. त्यांना निवडणूक आणण्यासाठी व देशात स्थिर सरकार आणण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांना आपणही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सुरुवातीला प्रक्रिया नवीन असल्याने व्यापारी वर्गाला व कर सल्लागारांना त्रास सहन करावा लागला. परंतु व्यापारी वर्गाने समाजात व भारतीय अर्थव्यवस्थेत नेहमीच मोलाचे योगदान देणाºया जीएसटीत महत्वपूर्ण सूचना दिल्या. याचा मला आनंद आहे. या सूचनांच्या आधारे जीएसटी कौन्सीलने एक मताने या सूचनांचा स्विकार करून कर प्रणाली सुलभ केली. यात व्यापाऱ्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. हा देश पुढे नेण्यासाठी व्यापारी बंधूंनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीला सहकार्य करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन राजकुमार जाजू, प्रास्ताविक अरूण काशिकर, आभार श्रीनिवास मोहता यांनी मानले. या बैठकीला भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी महाराष्ट्र चे सचिव जगदीश टावरी, शालिग्राम टीबड़ीवाल, संजय गोयनका, इद्रीस मेमन, दामोदर दरक, दिलीप कठाने, विशाल धीरन, किशोरभाऊ सुरकार, देवीदास करंडे, पंकज सराफ, नटवर रिणवा, राजकुमार जाजू, पांडु गायकवाड़, अशोक कृपलानी,ददनसिंग ठाकुर, गणेश देवानी, राजेश आहूजा, प्रवीण जैन, हरीश व्यास, श्रीकांत वाटकर, राकेश मंशानी, दीपन मिश्रा, सुरेश पंजवाणी, ढोलू आहूजा, प्रताप वाटवानी, सूरज रामानी, शेरा भाटिया तसेच बहुसंख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होते.