महाराष्ट्राचा नेता यूपीत लढतोय; रॉबिनहूड नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 14:52 IST2024-05-21T14:51:07+5:302024-05-21T14:52:09+5:30
बसपाने श्रीकला रेड्डी यांच्याऐवजी ऐनवेळी विद्यमान खासदार शाम सिंह यादव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय लोकांना रुचलेला तर नाहीच पण त्यांनी धनंजय सिंह यांचीसुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे.

महाराष्ट्राचा नेता यूपीत लढतोय; रॉबिनहूड नाराज
जौनपूर : महाराष्ट्रात गृहराज्यमंत्री राहिलेले कृपाशंकर सिंह यांच्या भाजपकडून उमेदवारीमुळे जौनपुरच्या निवडणुकीबद्दल राज्यात उत्सुकता आहे. २०२१ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपचा मार्ग पकडला. ते या मेदवारीबद्दल म्हणतात की, मातृभूमीचे ऋण कुणीच फेडू शकत नाही पण आता त्यातून काही अंशी - उतराई होण्याची संधी आता मला मिळाली आहे. त्यांचा सामना सपातर्फे लढणाऱ्या बाबुसिंह कुशवाह आणि बसपाचे शामसिंह यादव यांच्याशी आहे. मात्र धनंजय सिंह व केशवदेव मौर्य या स्थानिक नेत्यांच्या नाराजीमुळे भाजपचे काम सोपे झाले आहे.
बसपाने श्रीकला रेड्डी यांच्याऐवजी ऐनवेळी विद्यमान खासदार शाम सिंह यादव यांना उमेदवारी देण्याचा निर्णय लोकांना रुचलेला तर नाहीच पण त्यांनी धनंजय सिंह यांचीसुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
बसपाकडून आपल्या पत्नी श्रीकला रेड्डी * यांचे तिकीट कापल्या गेल्याने नाराज झालेले माजी खासदार धनंजय सिंह यांनी भाजप उमेदवाराला उघड पाठिंबा जाहीर केला आहे. धनजंय सिंह यांची सर्व समाज व सर्व थरातील लोकांना मदतीमुळे प्रतिमा स्थानिक रॉबिनहूडसारखी असल्याने ते लोकप्रीय आहेत.
• कुशवाह यांच्या उमेदवारीला महान दल पक्षाचे नेते केशवदेव मौर्य यांनी विरोध जाहीर करत त्यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकू देणार नसल्याचे म्हटले आहे.
२०१९ मध्ये काय घडले?
श्यामसिंह यादव, बसप (विजयी) - ५,२१,१२८
कृष्णप्रताप सिंह भाजप (पराभूत) ४,४०,१९२