उल्हासनगरमध्ये फोडाफोडीच्या भीतीने ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’! भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 09:28 IST2026-01-24T09:28:12+5:302026-01-24T09:28:28+5:30
बहुतांश नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ आहेत

उल्हासनगरमध्ये फोडाफोडीच्या भीतीने ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’! भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच
लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: महापौरपदासाठी भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच आहे. त्यामुळे नगरसेवक फुटू नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. बहुतांश नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यांना रिसॉर्टमध्ये हलविल्याची चर्चा आहे.
७८ पैकी भाजपकडे ३७ तर शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी ४० मॅजिक फिगर आहे. शिंदेसेनेने वंचित बहुजन आघाडी (२ जागा), साई पक्ष (१ जागा) व अपक्षाचा (१ जागा) पाठिंबा मिळविला आहे. शिंदेसेनेकडे ४० नगरसेवक झाले आहेत. शिंदेसेनेकडून खा. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांच्यावर नगरसेवकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी मात्र महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा दावा केला आहे. मात्र तेसुद्धा पडद्यामागे हालचाली करत असल्याचे समजते.